

BMC School Higher Education
ESakal
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूलचा दर्जा सुधारण्यात यावा, उच्च शिक्षणासाठी पालिका शाळांमध्ये ११ वी व १२ वीचे शिक्षण सुरु करावे, असे निवेदन प्रभू यांनी नवनियुक्त शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांना दिले. शिक्षण समिती अध्यक्ष पदाची जबाबदारी स्विकारताच राजेश्री शिरवडकर यांच्या समोर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक अंकित प्रभू यांनी पालिका शाळांतील समस्यांचा लेखाजोखा मांडला.