कोस्टल रोडचा दुसरा टप्पा रद्द; मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला धक्का 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

उद्धव यांच्या प्रतिष्ठेचा मार्ग 
कोस्टल रोड हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्‍न होता. विधानसभा निवडणूक, महापालिका निवडणुकीत कोस्टल रोड हा शिवसेनेने प्रचाराचा मुद्दा केला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी कोस्टल रोडचा दुसरा टप्पा रद्द करून शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. वांद्रे - वर्सोवा टप्पा मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या ताब्यात घेतल्याने या प्रकल्पाचे संपूर्ण श्रेय त्यांनाच मिळणार आहे. 

मुंबई - कोस्टल रोडचा दुसरा टप्पा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केला आहे. वांद्रेपासून वर्सोवापर्यंत राज्य रस्ते विकास महामंडळाला सागरी सेतू बांधण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. कोस्टल रोड हा शिवसेनेचा "ड्रीम प्रोजेक्‍ट' समजला जातो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा निर्णय म्हणजे शिवसेनेला धक्काच आहे, अशी चर्चा सुरू आहे. 

वांद्रे सागरी सेतूपासून कांदिवलीपर्यंत महापालिका कोस्टल रोड बांधणार होती. तर याच मार्गाला समांतर "एमएसआरडीसी'ने वांद्रे ते वर्सोवापर्यंत सागरी सेतू बांधण्याचा आराखडा तयार केला आहे. या प्रकल्पाला राज्य सरकारने परवानगीही दिली आहे. हे दोन्ही मार्ग समांतर जाणार होते. यासंदर्भातचा सरकारचा नियोजनशून्य कारभार "सकाळ'ने 21 जूनला उघड केला होता. पर्यावरणाच्या नुकसानीसह करदात्यांचे सुमारे सात हजार कोटी वाया जाणार होते, हे "सकाळ'ने मांडले होते. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी वांद्रेपासून वर्सोवापर्यंत सागरी सेतू बांधण्याचे निर्देश दिले आहेत. हा सागरी सेतू "एमएसआरडीसी' बांधणार असून, वर्सोवापासून कांदिवलीपर्यंतचा रस्ता महापालिका बांधणार आहे. वर्सोवापुढील मार्गाबाबत "एमएसआरडीसी' आणि महापालिकेने एकत्रित निर्णय घ्यावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. पालिकेने सध्या दक्षिण मुंबईतील नरिमन पॉइंट ते कांदिवलीपर्यंतच्या पहिल्या टप्प्याकडे लक्ष केंद्रित असून, त्यासाठी निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आल्या आहेत, असे महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. 

नरिमन पाइंट - वरळीपर्यंत कोस्टल रोड 
9.98 कि.मी.च्या या मार्गाचे काम पालिका करणार 
कोस्टल रोड वरळीत सागरी सेतूला मिळणार 
चार ते पाच हजार कोटींचा खर्च अपेक्षित 

वांद्रे - वर्सोवा सागरी सेतू 
10 कि.मी.च्या या मार्गाचे काम एमएसआरडीसी करणार 
या मार्गासाठी 502 कोटींचा खर्च अपेक्षित 
सध्याच्या सागरी सेतूपासून वांद्रे येथून हा मार्ग जोडणार 
ऑटर क्‍लब वांद्रे पश्‍चिम, जुहू कोळीवाडा येथे सी लिंकशी जोडणार 
वर्सोवा ते कांदिवली कोस्टल रोडचे काम पालिका करणार (अंदाजे तीन कि.मी.) 
हा मार्ग वर्सोवा येथे सागरी सेतूला जोडणार 

उद्धव यांच्या प्रतिष्ठेचा मार्ग 
कोस्टल रोड हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्‍न होता. विधानसभा निवडणूक, महापालिका निवडणुकीत कोस्टल रोड हा शिवसेनेने प्रचाराचा मुद्दा केला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी कोस्टल रोडचा दुसरा टप्पा रद्द करून शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. वांद्रे - वर्सोवा टप्पा मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या ताब्यात घेतल्याने या प्रकल्पाचे संपूर्ण श्रेय त्यांनाच मिळणार आहे. 

Web Title: costal road 2 project cancelled says Devendra Fadnavis