आचारसंहितेच्या जाळ्यात अडकला "कोस्टल रोड'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

मुंबई - नरिमन पॉइंटपासून कांदिवलीपर्यंतच्या "कोस्टल रोड'चे काम महापालिका निवडणुकीआधी सुरू करण्यात अपयश आले आहे. या मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील भू-तांत्रिक सर्वेक्षणाचे काम जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल; मात्र फेब्रुवारीत होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे हे काम सुरू होणे अवघड आहे.

कोस्टल रोडचे बांधकाम लवकर सुरू करण्याचे आश्‍वासन शिवसेनेने 2012च्या पालिका निवडणुकी वेळी दिले होते. त्यानंतर भाजपलाही या मार्गाचे काम पालिका निवडणुकांपूर्वी सुरू करायचे होते; मात्र आता हे काम निवडणुकीपूर्वी सुरू होणे शक्‍य नाही. महापालिकेने नरिमन पॉइंट ते वरळी सागरी सेतूपर्यंतच्या 9.98 किलोमीटरच्या कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यासाठी निविदा मागविल्या आहेत.

Web Title: costal road work issue in mumbai