esakal | दंडाधिकारी न्यायालयात समुपदेशनाचा श्रीगणेशा
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

दंडाधिकारी न्यायालयात समुपदेशनाचा श्रीगणेशा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नात्यांमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर कायदेशीर लब्यात सामोपचाराने तोडगा निघावा, यासाठी मुंबईतील (Mumbai) महानगर दंडाधिकारी न्यायालयामध्ये (Court) (एस्प्लानेड कोर्ट) समुपदेशन उपक्रमाचा श्रीगणेशा (Ganesh) करण्यात आला आहे. त्यामुळे प्रलंबित प्रकरणात पक्षकारांना समुपदेशन करत नव्याने नाते निर्माण करण्यासाठी मदत केली जाणार आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये असलेल्या महानगर दंडाधिकारी न्यायालयांमध्ये हजारो कौटुंबिक दावे प्रलंबित आहेत. घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार, मुलांचा ताथा. घटस्फोटीत पालकांची मुलांची भेट. अशा विविध प्रकारच्या दाव्यांचा यामध्ये समावेश आहे. या दाव्यांचा निपटारा सामोपचाराने दा, यासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणामार्फत है सुकून समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे. यामध्ये प्रशिक्षित समुपदेशकांचा समावेश असून त्यांच्यामार्फत सामोपचाराने समस्येवर समेट घडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रलंबित प्रकरण अथवा वाद सोडवण्यासाठी आणि भविष्यातील योजना आखण्यास या केंद्राद्वारे पक्षकारांना मदत केली. जाणार आहे.

हेही वाचा: "गोकुळ' ची प्रक्रिया सुरूच राहणार; न्यायालयातील याचिका मागे

आठवड्यात दोन दिवस सेवा महानगर दंडाधिकारी न्यायालयातील समुपदेश केंद्र आठवड्यात दोन दिवस, सोमवार आणि गुरूवारी सकाळी अकरा ते पाच या दरम्यान पक्षकारांना उपलब्ध राहणार आहे. मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयात असलेल्या दाव्यांसाठी पक्षकार या ठिकाणी जाऊ शकतात.

loading image
go to top