तोतया एफडीआय अधिकाऱ्यांना अटक

तोतया एफडीआय अधिकाऱ्यांना अटक
तोतया एफडीआय अधिकाऱ्यांना अटक

नवी मुंबई : अधिकारी असल्याचे सांगून कारवाईची भीती दाखवत, मिठाईच्या दुकानातील सुका मेवा घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चौघांना कामोठे पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्यांमध्ये अलिबाग तालुक्‍यातील दोन आरोग्य अधिकारी व एका सेवानिवृत्त आरोग्य निरीक्षकाचा समावेश असल्याचे आढळून आले. पोलिसांनी फसवणुकीसह पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली. 

आरोपी डॉ. संदीप देठे (२६), डॉ. शैलेश प्रमोद घालवाडकर (४६), भगवान म्हात्रे (६१) व राजकुमार बिराजदार हे चौघे कामोठेतील सेक्‍टर- २१ मधील बालाजी स्वीट्‌स या दुकानात गेले. या वेळी या चौघांनी अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी असल्याचे सांगून दुकानातील साहित्य उघड्यावर आहे. त्यामुळे कारवाई करण्याची व परवाना जप्त करण्याची धमकी दुकानदाराला धमकी दिली. तसेच त्यांनी दुकानमालक गणेश चौधरी याच्याकडे पाच हजार रुपयांची मागणी केली; मात्र चौधरी याने पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी दुकानातील ड्रायफ्रुट्‌सची चार पाकिटे घेतली. त्यामुळे दुकान मालक गणेशला संशय आल्याने त्याने कामोठे पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी त्यांची चौकशी करत, त्यांना अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com