क्रिकेट खेळण्याच्या वादातून दाम्पत्याला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादातून पनवेलमधील प्रभू आळीत राहणाऱ्या दाम्पत्याला त्याच भागात राहणाऱ्या प्रमोद भगत याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. धर्मराज मायदे (58) आणि कामिनी मायदे (54) असे जखमी दाम्पत्याचे नाव आहे. 

नवी मुंबई  : क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादातून पनवेलमधील प्रभू आळीत राहणाऱ्या दाम्पत्याला त्याच भागात राहणाऱ्या प्रमोद भगत याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. धर्मराज मायदे (58) आणि कामिनी मायदे (54) असे जखमी दाम्पत्याचे नाव आहे. 

मायदे यांच्या घरासमोरील रस्त्यावर 9 मे रोजी त्या भागातील मुले नेहमीप्रमाणे क्रिकेट खेळत होते. या वेळी त्यांचा बॉल मायदे यांच्या घरात किचनमध्ये गेल्यामुळे त्यांनी तो बॉल घेऊन थेट प्रमोद भगत याचे घर गाठले. मायदे काही बोलण्याच्या आत प्रमोद याने त्यांना शिवीगाळ केली. त्यामुळे त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. प्रमोद याने मायदे यांना मारहाण केल्यामुळे त्यांच्या पत्नी त्यांना सोडविण्यासाठी मध्ये गेल्यावर त्यांनाही ढकलून दिले.

या मारहाणीत मायदे जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यानंतर त्यांनी पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी प्रमोद भगत याच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.  

Web Title: The couple is beaten by the promise of playing cricket