

Development vs Environment: 208 Mangroves Cleared for Port Connectivity Project
sakal
मुंबई : प्रस्तावित वाढवण बंदराला राष्ट्रीय महामार्ग ४८शी जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी आठ पदरी महामार्ग प्रकल्पासाठी खारफुटी क्षेत्रातील ९.२४९८ हेक्टर जमीन वापरण्यास तसेच २०८ झाडे तोडण्यास उच्च न्यायालयाने मंजुरी दिली. हा प्रकल्प व्यापक आर्थिक हिताचा आणि सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.