सोमय्यांची चिंता वाढली! मुलाचा अटकपूर्व जामीन फेटाळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kirit-Somaiya

पीएमसी बँक घोटाळ्या प्रकरणी नील सोमय्या यांच्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आरोप केला होता.

सोमय्यांची चिंता वाढली! मुलाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

मुंबई - भाजप नेते किरिट सोमय्या (Kirit Somaiya) यांचे पुत्र नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामिन अर्ज आज मुंबई सत्र न्यायालायने फेटाळला आहे. यामुळे आता नील सोमय्या यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पीएमसी बँक घोटाळा (PMC Bank Scam) प्रकरणी नील सोमय्या यांच्यावर शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आरोप केला होता. याप्रकरणी झालेल्या सुनावणीवेळी अतिरिक्त सत्र न्यायाधीश दीपक भागवत यांनी नील सोमय्या यांचा जामिन फेटाळून लावला आहे.

पीएमसी बँक घोटाळ्यात आरोपी वाधवान हा किरीट सोमय्या यांच्या मुलाच्या कंपनीत संचालक आहे. पीएमसी बँक घोटाळ्यातील पैसा नील सोमय्या यांनी एका प्रकल्पात गुंतवल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. या प्रकरणात अटक होण्याच्या शक्यतेनंतर नील सोमय्या यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र सत्र न्यायालयाने नील सोमय्या यांना अटक पूर्व जामिन अर्ज फेटाळला आहे

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आऱोप करताना असाही दावा केला होता की, लवकरच पिता-पुत्र तुरुंगात जातील. किरिट सोमय्या आणि त्यांच्या मुलाचा पीएमसी बँक घोटाळ्याशी संबंध असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. या आरोपानंतर अटक होईल या भीतीने नील सोमय्या यांनी न्यायालयात धाव घेतली होती. जर या आरोपांवरून एफआयआर दाखल झाल्यास अटकेच्या ७२ तास आधी नोटिस देण्यात यावी असा अर्ज नील सोमय्या यांनी केला होता.