

BMC
ESakal
मुंबई : महापालिका निवडणुकीतील विजयानंतरही लोकप्रतिनिधींची डोकेदुखी कायम आहे. निवडणुकीवेळी उमेदवारांनी सादर केलेली जात प्रमाणपत्रे, संपत्तीची माहिती, गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि प्रतिज्ञापत्रातील त्रुटी यावरून एकूण ७९ नगरसेवकांच्या निवडीला न्यायालयात आव्हान दिले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागवलेल्या माहितीतून ही आकडेवारी समोर आली. माजी महापौर विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद बाद झाल्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.