नवी मुंबईतील १४ रेल्वे स्थानकांच्या हस्तांतरण प्रक्रियेला ब्रेक, न्यायालयाचे 'जैसे थे' आदेश; २६७ सफाई कामगारांचा प्रश्न उपस्थित

Navi Mumbai Railway Station: नवी मुंबईतील १४ रेल्वे स्थानकांच्या हस्तांतरण प्रक्रियेला न्यायालयीन आदेशामुळे ब्रेक लागला आहे.
Navi Mumbai 14 stations transfer process halts

Navi Mumbai 14 stations transfer process halts

ESakal

Updated on: 

पनवेल : नवी मुंबईतील १४ रेल्वे स्थानकांच्या हस्तांतरण प्रक्रियेला न्यायालयीन आदेशामुळे ब्रेक लागला आहे. या स्थानकांवर वर्षानुवर्षे स्वच्छतेचे काम करणाऱ्या २६७ कंत्राटी सफाई कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर आझाद कामगार संघटनेने न्यायालयीन लढा उभारला. न्यायालयाने परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिल्याने कामगारांना तूर्तास मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, अंतिम निर्णय होईपर्यंत संबंधित स्थानकांवरील स्वच्छतेची जबाबदारी सिडकोनेच सांभाळावी, असे पत्र रेल्वेने दिल्याने हस्तांतरण प्रक्रियेला खीळ बसली आहे.

Loading content, please wait...