

Malad Redevelopment Project
ESakal
मुंबई : मालाड परिसरातील खोत डोंगरी या हायप्रोफाईल पुनर्विकास प्रकल्पाच्या जमिनीवरून सुरू असलेला वाद आता थेट पोलीस ठाण्यात पोहोचला आहे. स्टेटस को असे न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही हे आदेश डावलून, 'क्लासिक ट्रेझर प्रायव्हेट लिमिटेड'च्या साईट ऑफिसवर झोपडी रिक्त करण्याच्या नावाखाली बेकायदेशीर कारवाई करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ही कार्यवाही करताना क्लासिक ट्रेझर्स ला या संबंधी कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती.