

Mumbai Local Travel
मुंबई : उपनगरीय लोकलमधून विशिष्ट वेळी प्रवास करताना प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो. अशावेळी दरवाजावर लटकून आपला जीव धोक्यात घालण्याशिवाय प्रवाशांसमोर पर्याय नाही. हे वास्तव नाकारता येणार नाही. तसेच, प्रवाशांच्या या कृतीला निष्काळजी म्हणता येणार नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण असे उच्च न्यायालयाने नोंदवले आणि रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशाच्या कुटुंबाला देण्यात आलेली भरपाई न्यायालयाने कायम ठेवली.