esakal | मुंबईचे वाईट दिवस संपल्यात जमा

बोलून बातमी शोधा

Pune And Mumbai
मुंबईचे वाईट दिवस संपल्यात जमा
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: मुंबईत दररोजच्या कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. कोरोनाची (Corona virus) दुसरी लाट ओसरत चालल्याचे हे लक्षण आहे. मागच्या काही दिवसात मुंबईत (Mumbai) कोरोना रुग्ण संख्या सातत्याने कमी होत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीचे आणि आताचे चित्र वेगळे आहे. मागच्या महिन्यात मुंबईत एकाचदिवशी ११,२०६ अशी सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. (Covid 19 Big dip in Mumbai cases the worst may be over)

काल म्हणजेच सोमवारी २,६२४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. काल २३,५४२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. एप्रिलच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. एप्रिल महिन्यात दररोजच्या कोरोना चाचण्यांचे सरासरी प्रमाण ४४ हजार होते. दुसऱ्या लाटेचा विचार करता, जे वाईट आहे, ते संपलं आहे, असं अधिकारी म्हणाले. मुंबईत लॉकडाउनमुळे फरक पडला हे खरं आहे. पण त्याचवेळी लसीकरणही जोरात सुरु आहे. ज्याचा फायदा पुढच्या काही महिन्यात दिसेल.

हेही वाचा: काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या प्रकृतीबद्दल चांगली अपडेट

रुग्णसंख्या कमी होत असली, तरी दररोजच्या मृत्यूचे प्रमाण कमी झालेले नाही. सोमवारी ७८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दररोजचा मृत्यूदर २.९ टक्के आहे. मागच्या आठवड्याच्या CFR च्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे. या आठवड्यात मृत्यूदर स्थिर राहील, पुढच्या आठवड्यापासून हे प्रमाण कमी होईल असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा: "कोविडची तिसरी, चौथी आणि अशा कितीही लाटा आल्या तरीही..."

मुंबईत आतापर्यंत ६.५८ लाख नागरीकांना कोरोनाची बाधा झाली असून १३ हजार ३७२ मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्रात सोमवारी सलग दुसऱ्यादिवशी कोरोना रुग्ण संख्येत घट नोंदवण्यात आली. सोमवारी ४८ हजार ६२१ कोरोना बाधितांची नोंद झाली. ५६७ मृत्यू झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत ४७.७ लाख नागरीकांना कोरोनाची बाधा झाली आहे. ७० हजार ८५१ मृत्यू झाले आहेत.