Covid 19 BodyBag Scam: माजी महापौर किशोरी पेडणेकरांची ईडीकडून तब्बल ६ तास चौकशी

Kishori Pedneka
Kishori Pedneka esakal

Kishori Pednekar: मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर गुरूवारी ईडी चौकशीला सामोरे गेल्या. कोविड बॉडी बॅग घोटाळ्या प्रकरणी पेडणेकरांची जवळपास ईडीकडून 6 तास चौकशी झाली. किशोरी पेडणेकर यांना याआधीदेखील चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं होतं. पण त्या चौकशीला सामोरं गेल्या नव्हत्या.

त्यानंतर त्या गुरूवारी चौकशीला सामोरं गेल्या. कोरोना काळात डेडबॉडी बॅगच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच प्रकरणी किशोरी पेडणेकर यांची चौकशी झाली. जवळपास 6 तासांच्या चौकशीनंतर किशोरी पेडणेकर ईडी कार्यालयाबाहेर आल्यावर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

Kishori Pedneka
Kishor Kadam: "अरे लूट थांबवा रे ही ..", मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे टोलवर कवी सौमित्र यांची संतप्त पोस्ट

पेडणेकरांवरील आरोप?

कोविड काळात मुंबई महापालिकेकडून पालिकेच्या रुग्णालयांसाठी मृतदेहांच्या बॅग खरेदी करताना 1800 रुपयांची एक बॅग 6800 रुपयांना विकत घेतल्याचं आरोप करण्यात आला आहे. तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सुचनेनुसार हा व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

बॉडी बॅग घोटळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं मागील महिन्यात महापालिका उपायुक्त रमाकांत बिरादार यांची चौकशी केली होती. बिरादार करोना काळात खरेदी विभागाचे प्रमुख होते. यापूर्वीच ईडीनं करोनाकाळातील कथित अनियमितेबद्दल बिरादार यांचा जबाब नोंदवला आहे. महापालिकेत कोविड काळात कथीत चार मोठे घोटाळे झाल्याचे आरोप असून त्यांपैकी बॉडी बॅग घोटाळा एक आहे.

Kishori Pedneka
Kishori Pednekar : छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगेन...; ईडीच्या चौकशीपूर्वी किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया

न्यायलायाकडून दिलासा

कोविडमुळे मृत्यू झालेल्या लोकांना नेण्यासाठी महापालिकेने बॉडी बॅग्सची खरेदी केली होती. मात्र, त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्यानंतर या प्रकरणी किशोरी पेडणेकर व महापालिकेच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी अटकेची शक्यता वर्तविण्यात होती.

मात्र, किशोरी पेडणेकर यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली होती. 4 सप्टेंबर रोजी न्यायालयाने त्यांनाअटकेपासून संरक्षण दिले होते. तसेच, 11 सप्टेंबर, 13 सप्टेंबर व 16 सप्टेंबर रोजी त्यांना पोलिसांतर्फे होणाऱ्या चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. त्यानुसार, किशोरी पेडणेकर चौकशीसाठी दाखल झाल्या होत्या परंतु याच प्रकरणी आता ईडीने पेडणेकरांना समन्स बजावले आहे

Kishori Pedneka
Kishori Pednekar: किशोरी पेडणेकरांना दिलासा नाहीच! कोर्टानं फेटाळला अटकपूर्व जामीन

"मी ईडीचं समन्स आल्यानंतर पहिल्या तारखेला येऊ शकले नाही. मी आज आली. त्यांनी जे प्रश्न विचारले त्याचे खरे उत्तरं देणं माझं काम आहे. मी मुंबई, महाराष्ट्र आणि देशाची नागरीक आहे. ते मी केलं आहे. त्यांना हव्या असणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली जाईल. मी त्यांना संपूर्ण सहकार्य केलं आहे"

- किशोरी पेडणेकर, माजी महापौर

Kishori Pedneka
Mumbai News : कोविड बॉडी बॅग घोटाळा; माजी महापौर किशोरी पेडणेकरांना आर्थिक गुन्हे शाखेचे समन्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com