esakal | मुंबईकरांसाठी एक मोठी चांगली बातमी

बोलून बातमी शोधा

Mumbai corona Virus Updates

निश्चित तुमची चिंता कमी होईल.

मुंबईकरांसाठी एक मोठी चांगली बातमी
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: मुंबईकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी लॉकडाउन लावण्यात आला आहे. या लॉकडाउनचा फायदा आता दिसू लागला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये घट होताना दिसतेय. चार एप्रिल ते २४ एप्रिल या २० दिवसातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर रुग्णवाढीचा आलेख घसरताना दिसेल. कोरोना रुग्णवाढीचा आलेख आता हळूहळू खाली येतोय, असे राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होतोय हा दावा करण्यापूर्वी ३० एप्रिलपर्यंत परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्यात येईल असे मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले. दर आठवड्याला मृतांची वाढणारी संख्या ही चिंता वाढवणारी बाब आहे. १८ एप्रिल ते २४ एप्रिल या काळाता कोरोना चाचण्या कमी झाल्या. त्याबरोबर पॉझिटिव्हीटी रेटही कमी झाला. चार एप्रिल ते १० एप्रिल या काळात पॉझिटिव्हीटी रेट २० टक्के होता. ११ ते १७ एप्रिल या काळात तो १८ टक्के झाला आणि १८ ते २४ एप्रिल या काळात पॉझिटिव्हीटी रेट १७ टक्के होता.

हेही वाचा: Corona Virus : अत्यवस्थ रुग्णांचे प्रमाण होतेय कमी

चार एप्रिल ते १० एप्रिल या काळात कोरोनामुळे १९० मृत्यू झाले. या आठवड्यात ३ लाख ४१ हजार ६१४ कोरोना चाचण्या केल्या. ११ एप्रिल ते १७ एप्रिल या आठवड्यात ३५७ मृत्यू झाले. त्या आठवड्यात ३ लाख ३५ हजार १८७ कोरोना चाचण्या केल्या. मागच्या आठवड्यात १८ ते २४ एप्रिल या काळात ४२५ मृत्यू झाले. या आठवड्यात २ लाख ९७ हजार ७३८ चाचण्या केल्या.

हेही वाचा: "प्रेतं उचलायलाही तयार"; परिस्थितीपुढे हतबल मजुराने मांडली व्यथा

"मुंबईत कोरोना रुग्णांची रोजची संख्या मागच्या १५ दिवसात ८ ते १० हजारच्या घरात आहे. पुढचे १५ दिवस त्यापेक्षाही महत्त्वाचे आहेत" असे मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले आहे. ३० एप्रिलनंतरच मुंबईत कोरोनाची लाट ओसरतेय किंवा नाही, याबद्दल ठामपणे बोलता येईल असे चहल यांनी म्हटले आहे.