यांना काही लाज? लॉकडाऊनमध्ये 'अशी' सुरु आहे दारूविक्री...

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 25 March 2020

वाईन शॉप, बीयर शॉप, हॉटेल, रेस्टॉरंट, दारू विक्रीची दुकाने रविवारपासून बंद झाल्यामुळे तळीरामांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. तर कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर काही जणांनी अगोदरच स्वतःसाठी तर काहींनी विक्रीसाठी मद्याचा साठा करून ठेवला आहे

नवी मुंबई,  वाशी - वाईन शॉप, बीयर शॉप, हॉटेल, रेस्टॉरंट, दारू विक्रीची दुकाने रविवारपासून बंद झाल्यामुळे तळीरामांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. तर कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर काही जणांनी अगोदरच स्वतःसाठी तर काहींनी विक्रीसाठी मद्याचा साठा करून ठेवला आहे. हा मद्यसाठा काही जणांकडून चढ्या दराने विक्री करण्यात येत आहे. स्थानिक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष असल्यामुळे या दारूविक्रेत्यांचे चांगलेच फावले आहे. 

लढा कोरोनाशी : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील जनतेला लिहिलेलं पत्र...

रविवारी पंतप्रधान मोदींनी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते; तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी राज्यात संचारबंदी लागू केली. त्यामुळे तळीरामांना दारू मिळत नसल्यामुळे त्यांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे काहींनी झोपडपट्टी परिसरात साठा करून ठेवला आहे. हा मद्यसाठा काही जणांकडून चढ्या दराने विक्री करण्यात येत आहे.

बेकायदा पद्धतीने दारूविक्री केली जात असेल तर ही गोष्ट गंभीर आहे. हा प्रकार चुकीचा असून, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. - संजय कुमार, पोलिस आयुक्त, नवी मुंबई. 

कोरोना लॉकडाऊन : अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहतूकदारांसाठी विशेष स्टीकर

सगळीकडेच बंद असल्यामुळे बेकायदा दारू व्यावसायिकांना चांगलाच भाव आला आहे. गावांमध्ये झोपडपट्टी, घरांतून दारूविक्री केली जात आहे. परवानाधारक दुकानांमधून दारू या बेकायदा व्यावसायिकांकडून विकत घेतली जात आहे. स्थानिक पोलिस मात्र याकडे कानाडोळा करीत असल्याचे चित्र पाहायला मिळात आहे.

covid 19 corona lockdown illegal liquor sale is done in navi mumbai vashi     

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 corona lockdown illegal liquor sale is done in navi mumbai vashi