कोरोना लॉकडाऊन : अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहतूकदारांसाठी विशेष स्टीकर

मृणालिनी नानिवडेकर
बुधवार, 25 मार्च 2020

अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहतूकदारांना विशेष स्टीकर लावण्यात येणार आहे. पुरवठादारांची एक विशेष बैठक बोलावून परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिनांक २४ मार्चला रात्री उशीरा त्यांच्याशी चर्चा केली.

मुंबई - जगभराप्रमाणे भारतात आणि महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय. भारत सध्या कोरोनाच्या चौथ्या आठवड्यात आहे. अशात चौथ्या आणि पाचव्या आठवड्यत कोरोना बाधित पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं आपण पाहिलंय. अशात महाराष्ट्रात आणि मुख्यत्वे मुंबईसारख्या जास्त वस्तीच्या शहरात कोरोनाचा अजूनही नियंत्रणात आहे. मात्र कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या वाढतेय हे देखील तेवढंच खरं आहे. कालच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचं लॉकडाऊन जाहीर केलंय. अशात महाराष्ट्रात अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांचं काय हा प्रश्न अनेकांच्या मनात घर करून गेलाय.

COVID19 : कोरोनाबाबत नसत्या अफवा पसरावणाऱ्यांच्या तोंडावर मारा 'ही' बातमी

अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहतूकदारांना विशेष स्टीकर लावण्यात येणार आहे. पुरवठादारांची एक विशेष बैठक बोलावून परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिनांक २४ मार्चला रात्री उशीरा त्यांच्याशी चर्चा केली. परिवहन कार्यालयांमध्ये 'अत्यावश्यक सेवा' असा टॅग असलेले स्टीकर पुरवण्यात येणार असल्याची माहिती समोर येतेय. हे स्टिकर्स पाहिल्यावर पोलिसांना त्या वाहनांना सोडून द्यावे अशा सूचना देण्यात येणार आहेत. 

COVID19 : दहावीचा विद्यार्थी कोरोनाग्रस्त; आला ३६ जणांच्या संपर्कात...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सध्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यात येतंय. अशात हे सर्व नागरिकांच्या आरोग्यासाठीच सुरु आहे. अत्यावश्यक सेवा खंडित होऊ नये, नागरिकांना लॉकडाऊनमध्ये कोणताही त्रास सहन करावा  नये आणि अत्यावश्यक सेवा पुरवठादारांना देखील आपली सेवा योग्य पद्धतीने देता यावी यासाठी आता सरकारकडून हे महत्त्वाचं पाऊल उचललं जाणार असल्याचं समजतंय. 

maharashtra state government is to issue emergency services tag to the concern people


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra state government is to issue emergency services tag to the concern people