esakal | परिस्थितीचं गांभीर्य ओळखा ! मुंबईत १४ तर पुण्यात आणखी १ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

परिस्थितीचं गांभीर्य ओळखा ! मुंबईत १४ तर पुण्यात आणखी १ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

महाराष्ट्रातील कालची ७४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची आकडेवारी आज ८९ वर

परिस्थितीचं गांभीर्य ओळखा ! मुंबईत १४ तर पुण्यात आणखी १ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाची चिंता वाढताना पाहायला मिळतेय. कारण महाराष्ट्रात आज दिनांक २३ मार्च रोजी कोरोनाग्रस्तांचा जो आकडा पुढे येतोय तो काळजी  वाढवणारा असाच आहे. काल महाराष्ट्रात ७४ वर असणारा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा आज ८९ वर गेलाय. म्हणजेच महाराष्ट्रात १५ नवीन कोरोना पॉझिटिव्ह केसेस आढळून आल्यात. या एकूण १५ पॉझिटिव्ह केसेसपैकी १४ पैकी एकूण १४ केसेस या मुंबईतील आहेत. 

आज महाराष्ट्रात आणखी एका नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हा नागरिक फिलिपिन्सचा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचा आकडा आता ३ वर गेलाय. राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातील दोन कोरोना रुग्ण हे ICU मध्ये आहेत.याचा पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

मोठी बातमी - मुंबईकरांचे भविष्य 'त्या' 402 प्रवाशांच्या हाती..
 

राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मृत्यू 

 • एकूण देशातील कोरोना परिस्थिती पाहता आता सोशल डिस्टंसिंगला फार महत्त्व आहे. 
 • कालच सांगितल्याप्रमाणे "मीच माझा रक्षक" या टॅगलाईन अंतर्गत सर्वांनी स्वतःची स्वतः काळजी घ्यावी 
 • अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त 'मी' घराबाहेर पडणार नाही हे लोकांनी पाळलं पाहिजे
 • स्वतः राजेश टोपे हे देशील आता पत्रकार परिषद न घेता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पत्रकारांशी आणि महाराष्ट्राशी संवाद साधणार. 
 • वाढलेल्या पंधरा १५ नागरिकांपैकी आठ नागरिकांना कॉन्टॅक्ट हिस्ट्री आहे. 
 • कॉन्टॅक्ट म्हणजे कम्युनिटी स्प्रेड नाही यावर राजेश टोपे यांनी जोर दिला  
 • यापैकी सहा लोकांना ट्रॅव्हल हिस्ट्री आहे 
 • महाराष्ट्रात कोरोना हा कम्युनिटीमध्ये म्हणजेच लोकांमध्ये स्प्रेड झालेला नाही 

मोठी बातमी - महाविद्यालयाची वसतिगृहे 'क्वारंटाईन'साठी आरक्षित करण्याच्या हालचाली सुरू

 • मुंबईकरांनी आज रस्त्यांवर गर्दी केली. मुंबईतील नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडताना पाहायला मिळालेत
 • मी आताच मुंबई कमिशनर यांच्याशी बोललो, त्यामुळे त्यांच्याकडून योग्य ती कारवाई करण्यात येईल  
 • कलाम ४१४ जमावबंदी लागू आहे, त्यामुळे गर्दी करू नये. ५ पेक्षा जास्त लोकांनी एकत्रित येऊ नये 
 • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही परिस्थितीत एकत्र येऊ नका 
 • एक बॅलन्स ठेवत पोलीस आणि प्रशासन काम करतायत 
 • हा आजार बरा होतो 
 • ८९ पैकी एक पुण्याचा आणि एक मुंबईचा रुग्ण ICU मध्ये आहे  
 • घाबरून जाऊ नका, मात्र काळजी घ्या आणि घरातून बाहेत पडू नका 
 • लोकांनी नियम पळाले नाहीत तर कारवाई करावीच लागेल 
 • येत्या २७ राखेपासून महाराष्ट्रातील मेडिकल कॉलेजमध्ये कोरोना टेस्टिंग लॅब सुरु होणार आहे 
 • राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवायला लागलाय, महाराष्ट्रातील रक्ताचा साठा कमी होतोय 
 • जे कायम रक्तदान करतात अशा सर्वांनी रक्तदान करावं 

covid 19 corona positive cases increased by 15 in maharashtra 14 are from mumbai 

loading image