esakal | हृदयद्रावक ! "...यांनी उशीर केला, माझे पप्पा गेले हो"; बेडसाठीची १२ तासांची फरफट व्यर्थ
sakal

बोलून बातमी शोधा

हृदयद्रावक ! "...यांनी उशीर केला, माझे पप्पा गेले हो";  बेडसाठीची १२ तासांची फरफट व्यर्थ

बेड मिळावा म्हणून कोरोना बाधीत रुग्णाची 12 तास फरफट झाली. 6 तास केवळ सिमेंटच्या कठड्यावर झोपावे लागले.

हृदयद्रावक ! "...यांनी उशीर केला, माझे पप्पा गेले हो"; बेडसाठीची १२ तासांची फरफट व्यर्थ

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : बेड मिळावा म्हणून कोरोना बाधीत रुग्णाची 12 तास फरफट झाली. 6 तास केवळ सिमेंटच्या कठड्यावर झोपावे लागले. तासोनतास ऍम्ब्युलन्सची वाट पहावी लागली. अखेर 12 तासांच्या प्रयत्नानंतर बेड मिळला मात्र तोपर्यंत रुग्णाला मृत्यूने कवटाळले होते. घाटकोपरमधील रमाबाईनगर मधील रुग्णाची ही कहाणी असून मयतांची मुलं अद्याप या धक्क्यातून सावरलेली नाहीत.

घाटकोपर येथील माता रमाबाई नगरमधील एका रुग्णासोबत हा दुर्दैवी प्रकार घडला. रमाबाई आंबेडकर नगर वसाहतीच्या आनंदविकास चाळ येथील वय वर्ष 57, पाॅझीटिव्ह रुग्णास तब्येत बिघडली म्हणून कुटुंबीय तातडीने राजावाडी रुग्णालयात घेऊन गेले. मात्र तिथे 6 तास झाले तरी दाखल केले नाही असे त्यांची मुले सांगतात. रुग्णालयाच्या डाॅक्टरांशी बोलणे केले, मात्र त्यांनी बेड खाली नसल्याचे सांगत सायं 9.30 ला 2 पेशंट डिस्चार्जड होतील, मग ऍडमीट करून घेवू असे सांगून दिलासा दिला. मात्र बेड खाली न झाल्याने त्या रुग्णाला आत प्रवेश मिळालाच नाही.

मोठी बातमीशरद पवारांनी घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट. राजकीय पडद्यामागे 'मोठ्या' हालचाली ?

त्यामुळे रुग्णालयाबाहेर सहा तास त्या पाॅझीटिव्ह पेशंटला कठड्यावर झोपावे लागले असे ही पाणावलेल्या डोळ्यांनी मुुले  सांगतात. यामुळे आसपासच्या लोकांना ही संसर्ग होण्याचा धोका होता. राजावाडी रुग्णालय प्रशासनाने मुलुंड येथील मिठागर शाळेत सोय केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ऍम्ब्युलन्ससाठी धावाधाव केली. अखेर काही वेळाने ऍम्ब्युलन्सची सोय झाली. रात्री 12 वाजता वााडीलांना मुलुंडच्या मिठागर येथील केंद्रावर नेल्याचे मुले सांगतात.तोपर्यंत वडीलांंची तब्येत चिंताजनक झाली होती. 

वडीलांंना पाहून मुलुंड केेंद्रातील डाॅक्टरांनी केस हाताबाहेर गेल्याचे सांगितले. पुढेे तुम्हाला शक्य असेल तर खाजगी हाॅस्पीटलमध्ये घेवून जाण्याचा सल्ला ही दिला. मात्र आमची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने खासगी रुग्णालयात नेणे तेव्हडे सोपे नव्हते. मात्र खासगी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्याआधीच वडिलांनी अखेर मृत्यूला कवटाळल्याचे पाणावलेल्या डोळ्यांनी मुलांनी सांगितले.

वडील गेल्याने सतत 12 तास धावाधाव केलेल्या त्या रुग्णाच्या मुलांनी टाहो फोडला. "...यांनी उशीर केला, माझे पप्पा गेले हो!" हे वास्तव ऐकायला मिळाल्याचे माजी नगरसेवक नामदेव उबाळे यांनी सांगितले. रात्री दीड वाजता मुलुंड पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांशी मृतदेहाबाबत चर्चा केली. एवढ्या रात्री कसा मृतदेह ताब्यात कसा नेणार ? मयताच्या नातेवाईकांना कळवावे लागेल, सकाळी अंत्यसंस्कार केले तर चालतील का असे पोलिसांना विचारले.

मोठी बातमी - अरे चाललंय काय? कोरोनाग्रस्त गर्भवती महिला 6 तास रुग्णवाहिकेच्या प्रतिक्षेत; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

मात्र त्यानी नियमांवर बोट ठेवत मृतदेह इथे ठेवता येणार नाही असे सांगितल्याचे ही उबाळे म्हणाले. आताच अंत्यसंस्कार करावे लागणार असल्याने ना हरकत दाखल्यासाठी पुन्हा धावाधाव सुरू झाली. रात्रीचे दीड वाजता घाटकोपर हायवेवरून जड मनाने मुले बाईक वरून ना हरकत दाखल्यासाठी पंतनगरला आली. परत अडीच वाजता मुलुंडला  गेली. नातेवाईकांपैकी मामांना कळवले मात्र बिल्डींग सील आहे, येता येणार नाही, तुम्ही अंत्यसंस्कार महापालिकेच्या नियमाप्रमाणे करून घ्या असे मामांनी कळवले. शेवटी आईला न कळवता दोन्ही भावांनी पहाटे 5 वाजता जड अंतकरणाने अंत्यसंस्कार उरकून घेतल्याचे उबाळे यांनी सांगितले. घडला प्रकार अतिशय वाईट होता. हा हलगर्जीपणाचा बळी की व्यवस्थेचा हा प्रश्न मला पडला. हे रोज घडू लागले आहे.म्हणून लोकांनी जागृत राहून एकमेकांना मानसिक आधार तरी द्यावा असे आवाहन उबाळे यांनी शेवटी केले.

मुंबईत असे अनेक कुटूंबं आहेत ज्यांची फरफट होत आहे. घरातील व्यक्तींचा मृत्यू आजारपणामुळे, वयोमानानुसार झाला तरी पाॅझीटिव्ह दाखवण्यात येत आहे. याबाबत प्रशासनाला याचा जाब विचारायला हवा. कोरोना पाॅझीटिव्ह किंवा क्वारंटाईन असणारे लोक सध्या भयभीत आहेत. त्यामुळे कुणी बोलायला पुढे येत नसल्याचे ही उबाळे म्हणाले.

covid 19 did not get get bed for more than 12 hours after families struggle man lost his life