मुंबईतील कर्करोगाच्या रुग्णांमध्ये कोविड -19 मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक

भाग्यश्री भुवड
Wednesday, 4 November 2020

मुंबईच्या एकूण मृत्यू दराच्या तुलनेत कर्करोगाच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक कोविड-19 मृत्यूचे प्रमाण आहे. परळच्या टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या  आकडेवारीनुसार, कोरोना व्हायरस कर्करोगाच्या रुग्णांमध्ये 9.8 टक्के मृत्यू दर आहे जो मुंबई शहरातील मृत्यू दरापेक्षा तिपटीने जास (3.9 टक्के) आहे.

मुंबई: मुंबईच्या एकूण मृत्यू दराच्या तुलनेत कर्करोगाच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक कोविड-19 मृत्यूचे प्रमाण आहे. परळच्या टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या  आकडेवारीनुसार, कोरोना व्हायरस कर्करोगाच्या रुग्णांमध्ये 9.8 टक्के मृत्यू दर आहे जो मुंबई शहरातील मृत्यू दरापेक्षा तिपटीने जास (3.9 टक्के) आहे. दरम्यान, सिगारेटच्या कमी प्रमाणात वापरामुळे, मृत्यूचे प्रमाण पाश्चात्य देशांपेक्षा कमी आहे. 

रूग्णालयातर्फे तीन कोविड सेंटर सुरू करण्यात आली आहेत. जेथे 1,140 कर्करोगाच्या रुग्णांना सह-संसर्गावर उपचार देण्यात आले आहेत. यापैकी 112 जणांचा संसर्ग झाला. 50 वर्षापेक्षा जास्त वयाच्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. दरम्यान ऑन्कोलॉजिस्टच्या मते, पाश्चात्य देशांच्या तुलनेत सह-संक्रमित कर्करोगाच्या रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण भारतात कमी आहे. तंबाखूचे सेवन भारतात जास्त होत असल्याने त्यांचे फुफ्फुस आरोग्यदायी राहते. ज्यामुळे त्यांना कोविड -19 च्या संसर्गापासून वाचवण्यात त्यांना यश आले. ऑगस्ट 2020 मध्ये लॅन्सेटने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, रक्त कर्करोगाने ग्रस्त रूग्णांना या संसर्गाची लागण सर्वात झाली आहे.

आकडेवारीनुसार 2, 57,497 जण मुंबईत कोविड 19 च्या संपर्कात आले. त्यापैकी 10, 293 जण संसर्गातून बळी पडले. दुसरीकडे, टाटा मेमोरियल भारतातील अग्रगण्य कर्करोग रुग्णालयात दरवर्षी 70,000 कर्करोगाचे रुग्ण आढळतात आणि मार्च ते ऑक्टोबर दरम्यान कोविड -10 सह-संसर्ग झालेल्या 1,140 कर्करोगाच्या रूग्णांवर उपचार केले गेले. यापैकी 112 रुग्णांना उपचारादरम्यान संसर्ग झाला.

याविषयी ज्येष्ठ ऑन्कोलॉजिस्ट यांनी सांगितले की, कर्करोगाच्या रुग्णांना रोगप्रतिकारक शक्तीच्या कमतरतेमुळे विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते आणि त्यांपैकी मृत्यूची संख्याही जास्त असते. 

अधिक वाचाः  कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा विश्वासू तारिक परवीनच्या पुतण्याला अटक

रोग प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या रूग्णांमध्ये, शरीराच्या पांढर्‍या रक्त पेशी, जे संक्रमणास विरोध करतात. त्या कमी होतात किंवा कार्य करत नाहीत. त्यामुळे प्रभावीपणे संक्रमणाशी लढण्यासाठी शरीर अपयशी ठरते. 

टाटा रुग्णालयाचे संचालक डॉ. सी एस प्रमेश यांनी सांगितले की, कर्करोगाच्या रुग्णांमध्ये विशेषत: जे सक्रिय केमोथेरपीवर आहेत त्यांना संसर्गाची लागण सर्वात धोकादायक असते. शिवाय, 50 वर्षापेक्षा जास्त वयाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये संसर्ग आणि मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. जर त्यांना इतर आजार असतील तर त्यांचा संसर्ग अधिक प्राणघातक होतो.

अधिक वाचाः  विम्याची रक्कम मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक, चौघांना अटक

कर्करोगाचा रक्त, हाडांचा मज्जा आणि लिम्फ नोड्सवर परिणाम होतो. मुंबईतील ऑन्कोलॉजिस्टच्या रूग्णांनुसार रक्त-विकार हेमेटोलॉजिकल सदोषीत रुग्णांना सर्वाधिक धोका असतो. त्यांचे कर्करोग त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर थेट परिणाम करतात.

-------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

covid 19 has the highest death rate among cancer patients in Mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 has the highest death rate among cancer patients in Mumbai