नागरिकांना विचार करायला लावणारं भन्नाट ट्विट मुंबई पोलिसांकडून व्हायरल

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 7 जुलै 2020

. आताही मुंबई पोलिसांनी आणखी एक भन्नाट ट्विट केलं आहे. मुंबई पोलिसांचं हे ट्विट व्हायरल झालं आहे. 

मुंबई- कोरोना व्हायरसनं सर्वत्र विळखा घातला आहे. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जात आहे. अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर्स, पोलीस, नर्सेस अहोरात्र मेहनत घेताहेत. अशातच कोरोनाला रोखण्यासाठी तोंडाला मास्क लावणं, सॅनिटायझरचा वापर करणे तसंच सोशल डिस्टन्सिंग ठेवणं हे महत्त्वाचं आहे. अशातच कोरोना व्हायरसबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि आवश्यक उपाययोजना करण्यासाठी मुंबई पोलिस नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट सक्रियपणे पोस्ट शेअर करीत आहेत. आताही मुंबई पोलिसांनी आणखी एक भन्नाट ट्विट केलं आहे. मुंबई पोलिसांचं हे ट्विट व्हायरल झालं आहे. 

मुंबईकरांनो! गणपतीला गावी जायचंय... मग त्याआधी गावकऱ्यांचे नियम जाणून घ्या

सोमवारी मुंबई पोलिसांनी ट्विटरवर एका सीक्रेट मॅसेजसह एक पोस्ट शेअर केली आहे. लोकप्रिय इमोजींचा वापर करुन पोलिसांनी नागरिकांना एक मजबूत जबरदस्त मॅसेज दिला आहे. पोलिसांनी केलेलं हे ट्विट नागरिकांना नक्कीच विचार करणारं लावणारं आहे. 

ही पोस्ट शेअर करताना पोलिसांनी लिहिलं की, या मॅसेजचा अर्थ काय आहे? हे जबाबदार मुंबईकरांना नक्कीच माहित असेल. इमोजीनं भरलेल्या ट्विटमध्ये सर्वांसाठी एक सीक्रेट मॅसेज आहे. पोलिसांनी या ट्विटमध्ये हॅगटॅगचाही वापर केला आहे. #EmojisForMumbai  हा हॅशटॅग ट्विटच्या शेवटी वापरला आहे. 

हा सीक्रेट मॅसेजचा अर्थ समजणं अवघड नाही आहे. कारण त्यात पोलिसांनी दिवसभरात अनलॉक कधी आणि संचारबंदी कधी याच्या वेळा समजावून सांगितल्या आहेत. त्यात नागरिक कधी बाहेर पडू शकतात आणि नागरिकांना घरी कधी बसायचं हे सांगितलं आहे. 

हे ट्विट शेअर केल्यापासून साडे तीन हजारांहून जास्त लाईक्स या ट्विटला मिळालेत. तर 400 हून अधिक लोकांनी हे ट्विट रिट्विट केलं आहे. 

नारायण राणेंनी माहिती घेऊन विधाने करावी; शिवसेना महिला आमदाराचा पलटवार

उरी स्टाइल ट्विट

काही दिवसांपूर्वीही मुंबई पोलिसांनी उरी: द सर्जिकल स्ट्राइक या सिनेमातील हाऊज द जोश हा डायलॉग बराच प्रसिद्ध झाला होता. हाच संदर्भ घेऊन मुंबई पोलिसांनीही ट्विट केलं आहे. 

या डायलॉगचा आधार घेत, त्यात थोडासा ट्विस्ट करुन मुंबई पोलिसांनी नागरिकांना 'हाऊज द डिस्टन्स?' अशी विचारणा केली आहे. पोलिसांनी विकी कौशलचा फोटो शेअर करत 'हाऊज द डिस्टन्स' असं कॅप्शन दिलं आहे. 

पण पोलिसांना विकी कौशलचा हा फोटो एडिट केला आहे. या फोटोत त्याच्या तोंडाला मास्क लावण्यात आला आहे आणि त्यात 'सहा फिट सर' असं फोटोखाली लिहिण्यात आलं आहे. बॉलिवूड सिनेमातील या प्रसिद्ध डायलॉगचा उत्तमरित्या वापर करुन मुंबई पोलिसांनी चांगली जनजागृती केली आहे. 

या पोस्टच्या माध्यमातून पोलिसांनी सहा फूट अंतराचं नियम पाळायला विसरु नका असा संदेश दिला आहे. मुंबई पोलिस नेहमीच आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन अशा पद्धतीचे रंजक पोस्ट करून नागरिकांमध्ये जनजागृती करत असतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 mumbai polices latest tweet has secret message in emojis