नारायण राणेंनी माहिती घेऊन विधाने करावी; शिवसेना महिला आमदाराचा पलटवार

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 7 जुलै 2020

उद्धव ठाकरे हे ऑनलाईन माध्यमातून सर्वत्र उपस्थिती लावीत असल्याने, राणे यांनी योग्य माहिती घेऊन विधाने करावीत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

मुंबई : मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेर पडत नसल्याबाबत भाजप खासदार नारायण राणे यांनी केलेल्या टीकेला शिवसेना आमदार व प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे हे ऑनलाईन माध्यमातून सर्वत्र उपस्थिती लावीत असल्याने, राणे यांनी योग्य माहिती घेऊन विधाने करावीत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

कोरोनाशी लढा तीव्र! रेल्वे स्टेशनवरही या गोष्टी उपलब्ध होणार...

आज संपूर्ण देश आधुनिक तंत्रज्ञानाच्या म्हणजेच ऑनलाईन माध्यमातून काम करीत आहे. मुख्यमंत्री ठाकरे तसेच महाविकास आघाडीतील सर्व मंत्री वेबिनार, ऑनलाईन परिसंवाद-बैठका आदी दृकश्राव्य माध्यमातून कार्यक्रम करीत आहेत व कामे मार्गी लावीत आहेत. ऑनलाईन पद्धतीने संवाद साधण्याची जनतेचीही तयारी झाली आहे व महाविकास आघाडी सरकारदेखील याच माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवीत आहे. जिथे प्रत्यक्ष उपस्थितीची गरज आहे तेथे मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्रीदेखील प्रत्यक्ष उपस्थित राहून जनतेला धीर देण्याचे काम करीत आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी आघाडी सरकार योग्य ती सर्व पावले उचलीत आहेत. त्यामुळे राणे यांनी अचूक माहिती घेऊनच पत्रकार परिषदा घ्याव्यात, असा टोलाही कायंदे यांनी लगावला आहे. 

चीनी बहिष्काराची लॅमिंग्टन रोडला धास्ती, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमती महागणार...

राज्यात कोरोनावर नियंत्रण न येण्यामागे ठाकरे यांची निष्क्रीयता कारणीभूत असल्याची टीकाही राणे यांनी केली होती. त्याचाही श्रीमती कायंदे यांनी समाचार घेतला आहे. अजूनही जगात व देशात कोरोनाचा फैलाव आटोक्यात येत नसताना महाराष्ट्र सरकारने सोशल डिस्टन्सिंचे पालन करीत जून महिन्यात अनलॉकिंग सुरु केले. यानुसार योग्य ती काळजी घेत उद्योगधंदे व आवश्यक व्यवहार सुरु झाले. तर जेथे कोरोनाचा फैलाव जास्त आहे तेथे अजूनही लॉकडाऊन सुरूच आहे. आज देशात सर्वत्र कोरोना नियंत्रणासाठी धारावी आणि वरळी पॅटर्नची चर्चा सुरु असून केंद्र सरकारनेसुद्धा राज्यातील आरोग्य यंत्रणांची पाठ थोपटली आहे. त्यामुळे राणे यांची टीका अनाठायी असल्याचे दिसते, असेही कायंदे यांनी म्हटले आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narayan Rane should take information and make statements; Shiv Sena MLA's retaliation