esakal | 'बोलघेवड्यांना एवढचं सांगू इच्छितो की...' देवेंद्र फडणवीस म्हणाले...

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

त्यामुळे रोज सकाळी कांगावा करु नका...

'बोलघेवड्यांना एवढचं सांगू इच्छितो की...' देवेंद्र फडणवीस म्हणाले...

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: "१० दिवसांसाठी रेमडेसिव्हीरचं १६ लाखांचं उत्पादन होतं. त्यात केंद्र सरकारने महाराष्ट्राला ४ लाख ३५ हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध करुन दिली आहेत. सर्वात मोठा कोटा महाराष्ट्राला मिळला आहे" असे फडणवीस म्हणाले.

"१७५० मेट्रीक टन ऑक्सिजन उपलब्ध करुन दिलाय. खरंतर या बद्दल बोलू नये पण जे बोलघेवडे लोकं सातत्याने केंद्र सरकारबद्दल बोलतायत. त्यांच्याकरता एवढच सांगू इच्छितो की, इतर कुठल्याही राज्यापेक्षा दुप्पट ऑक्सिजनचा कोटा केंद्राने आपल्याला दिला आहे" या शब्दात फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला.

हेही वाचा: टि्वट का डिलीट केलं जातं याची कल्पना नाही- देवेंद्र फडणवीस

"११०० पेक्षा जास्त व्हेंटिलेटर्स आपल्याला दिलेत. इंडियन एअर फोर्सच्या माध्यमातून वैद्यकीय साधनसामुग्री महाराष्ट्रात पोहोचवली जात आहे. कांगावेखोरांना सांगू इच्छितो की, जे लोक दु:खात आहेत, केंद्र सरकार त्यांना मदत करतेय. राज्य सरकारही प्रयत्न करतेय. त्यामुळे रोज सकाळी कांगावा करु नका" असे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा: "आपल्याला झेपतील आणि समजतील अशीच ट्विट करा"

"लसीकरणाची रणनिती आपल्याला ठरवावी लागेल. मोठ्य प्रमाणावर जनसमूह त्यामध्ये येणार आहे. गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लसीकरणाची रणनिती ठरवावी लागेल" असे फडणवीस यांनी सांगितले.