मोठी बातमी - सर्व बँकांनी पुढील तीन महिन्यांसाठी EMI स्थगित करावा, RBI चा सल्ला

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 March 2020

बँका पुढील तीन महिन्यांसाठी EMI स्थगित करू शकतात - RBI 

मुंबई - देशभरावर कोरोनाचं सावट आहे. भारत कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सज्ज झालाय. अशात काल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक लाख सत्तर हजार रुपयांचं पॅकेज जाहीर केलंय. या माध्यमातून या देशातील गरीब जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला गेलाय. अशात आज RIB गर्व्हरनर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शक्तिकांता दास यांनी सर्व बँकांना पुढील ३ महिन्यांसाठी EMI स्थगित करण्याचा सल्ला दिलाय.  

मोठी बातमी -  तुमचा आमचा 'क्वारंटाईन टाईम' सुकर करण्यासाठी AirTel देणार 'ही' सुविधा अगदी मोफत

RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांच्या पत्रकार पत्रकार परिषदेत बँकांना व्याजदरात ०.७५ टक्क्याची कपात करून तो ४.४० टक्के करण्यात केला आहे याबाबत माहिती दिली. व्याजदर कपातीने गृह कर्ज तसेच वाहन कर्ज यांचा मासिक हप्ता कमी होण्यास मदत होणार आहे. याचसोबत सर्व बँकांनी पुढील तीन महिन्यांसाठी EMI स्थगित करण्याचा सल्ला दिलाय. 

शक्तिकांता दास यांच्या पत्रकार परिषदेतील  मुद्दे : 

  • सर्व  बँका आणि वित्तीय संस्थांना पुढील तीन महिन्यांसाठी कर्जाचे हफ्ते स्थगित करण्याची मुभा
  • RBI ने रेपो रेटमध्ये ०.७५ बेसिस पॉईंटने कपात केलीये, त्यामुळे सध्याचा दर ४.४० टक्के असणार आहे 
  • याचसोबत रिव्हर्स रेपो रेटमध्ये ०.९० टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. त्यामुले सध्याचा दर ४ टक्के झालाय 

COVID19 : मुंबई दुसऱ्यावरून कोरोनाच्या तिसऱ्या स्टेजला पोहोचलीये का ?

  • CRR मध्ये १ टक्क्यांची कपात करण्यात आलेली आहे, SLR मधून मार्जिनल स्टँडिंग फॅसिलीटी २ टक्क्यांवर आणली आहे 
  • यामुळे देशातील बँकिंग क्षेत्रात १ लाख ३७ हजार कोटी कॅश फ्लो राहणार आहे 
  • RBI ने उचललेल्या पावलांमुळे देशभरात अतिरिक्त कॅश फ्लो राहू शकणार असल्याचं शक्तिकांता दास म्हणालेत

covid 19 RBI gives permission to postpone EMI collection for next three month


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 RBI gives permission to postpone EMI collection for next three month