तुमचा आमचा 'क्वारंटाईन टाईम' सुकर करण्यासाठी AirTel देणार 'ही' सुविधा अगदी मोफत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

ज्यांना वाचनाची आवड आहे अशा सर्वांना आपल्या स्मार्टफोनमध्ये 'जगरनॉट बुक्स' हे ऍप डाऊनलोड करून मोफत पुस्तकं वाचता येणार आहेत.

मुंबई - भारतात कोरोना पॉझिटिव्ह केसेस ची आकडेवारी सहाशेच्या वर गेलीये. अशात भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन जारी केलाय. सर्वांना आहे त्या ठिकाणी राहण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. अशात दूरसंचार कंपनी भारती AirTel ने तुमचं आमचा क्वारंटाईन टाइम सुलभ करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलंय.

भारती AirTel ने त्यांचा ई-बुक प्लॅटफॉर्म 'जगरनॉट' हा आता सर्वांसाठी मोफत खुला केलाय. भारतात लॉकडाऊन असल्याने आपण सर्व घरात आहोत. अशात भारतातील नागरिकांसाठी त्यांचा क्वारंटाईन कालावधी अधिक सुकर होण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचललं आहे.     

COVID19 : मुंबई दुसऱ्यावरून कोरोनाच्या तिसऱ्या स्टेजला पोहोचलीये का ?

AirTel ने याबाबत माहिती दिलीये. AirTel च्या माहितीप्रमाणे 'COVID-19 चं भारतातील संक्रमण रोखण्यासाठी सर्वजण सध्या घरात आहेत. अशात ज्यांना वाचनाची आवड आहे अशा सर्वांना आपल्या स्मार्टफोनमध्ये 'जगरनॉट बुक्स' हे ऍप डाऊनलोड करून मोफत पुस्तकं वाचता येणार आहेत. या ऍप्लिकेशमध्ये अनेक पुस्तकं आणि कादंबऱ्यांचा समावेश आहे.  याआधी ही सुविधा विकत घ्यावी लागत होती. हे तेच ऍप आहे जे या आधी AirTel बुक्स या नावानी ओळखलं जात होतं.   

सध्याच्या क्वारंटाईन काळात, अनिश्चततेच्या काळात लोकांनी घरातल्या घरात स्वतःला चांगल्या गोष्टींमध्ये गुंतवणून घेण्याची गरज आहे. अशात वाचन हा सर्वोत्तम पर्याय राहू शकतो, असं भारती AirTel चे चीफ प्रॉडक्ट ऑफिसर आदर्श नायर यांनी म्हटलंय. 

to make our quarantine time better bharati AirTel to made juggernaut books service free for all


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: to make our quarantine time better bharati AirTel to made juggernaut books service free for all