मुंबईकरांची चिंता वाढली! मुंबईत रूग्णवाढीच्या दरात वाढ, वाचा सविस्तर

मिलिंद तांबे
Tuesday, 8 September 2020

मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,57,410 झाली आहे.  रूग्णवाढीच्या दरात ही वाढ झाली असून तो 0.98 वरून 1.03 वर पोहोचला आहे.

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत ही बाधित रुग्णांचा आकडा वाढताच राहिला. सोमवारी 1,788 रुग्ण आढळून आले.  मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,57,410 झाली आहे.  रूग्णवाढीच्या दरात ही वाढ झाली असून तो 0.98 वरून 1.03 वर पोहोचला आहे. मुंबईत सोमवारी 31 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 7,897 वर पोहोचला आहे. मुंबईत सोमवारी 1,541 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 79 टक्के इतका आहे.

 मुंबईत नोंद झालेल्या 31 मृत्यूंपैकी 25 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 21 पुरुष तर 10 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 31 रुग्णांपैकी दोघांचे वय 40 वर्षा खालील होते. 21 रुग्णांचे वय 60 वर्षावरील होते तर 8 रुग्ण 40 ते 60 वर्षादरम्यान होते.

अधिक वाचाः  LockdownEffect: भाड्याच्या जागांचे मार्केट रोडावले; 25 ते 30 टक्क्यांनी किंमती कमी; तरीही प्रतिसाद नाही

 कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. सोमवारी 1,541 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 1,25,019 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 67 दिवसांवर गेला आहे. तर 6 सप्टेंबर पर्यंत एकूण 8,34,344  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दरात वाढ होऊन तो 1.03 इतका झाला आहे. 

अधिक वाचाः  ग्राहक न्यायालये अजूनही बंद; तीन महिन्यांपासून एकही सुनावणी नाही

मुंबईत 573 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 6,825 असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले 7,222 अति जोखमीचे रुग्ण आहेत तर 2,375 रुग्ण कोविड केअर सेंटर 1 मध्ये उपचार घेत आहेत.

---------------

(संपादनः पूजा विचारे)

Covid 19 september 7 updates mumbai 1788 new cases


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid 19 september 7 updates mumbai 1788 new cases