ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव; पाचही तालुक्यांमध्ये कोव्हिड केअर सेंटर

राहुल क्षीरसागर
शनिवार, 23 मे 2020

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. जिल्ह्यातील शहरी भागातून ग्रामीण भागातही कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी रुग्णालये व खासगी रुग्णालयांसह काही हॉटेलमध्ये विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. मात्र, वाढत्या रुग्ण संख्येमुळे ते देखील कमी पडू लागल्याने, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात 'कोव्हिड केअर सेंटर'सह 'डेडिकेट कोविड हेल्थ सेंटर' आणि 'डेडिकेट कोव्हिड रुग्णालया'ची उभारणी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहेे. त्यानुसार जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये सुमारे अडीच हजार खाटांचे कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे.

ठाणे :  ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. जिल्ह्यातील शहरी भागातून ग्रामीण भागातही कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी रुग्णालये व खासगी रुग्णालयांसह काही हॉटेलमध्ये विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. मात्र, वाढत्या रुग्ण संख्येमुळे ते देखील कमी पडू लागल्याने, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात 'कोव्हिड केअर सेंटर'सह 'डेडिकेट कोविड हेल्थ सेंटर' आणि 'डेडिकेट कोव्हिड रुग्णालया'ची उभारणी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहेे. त्यानुसार जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये सुमारे अडीच हजार खाटांचे कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे.

क्लिक करा : मुंबई-पुणे प्रवास करायचाय? माहिती घेऊनच बाहेर पडा... 

जिल्ह्याातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय गेल्या महिन्यातच 'करोना रुग्णालय' म्हणून घोषित केले होते. करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी या ठिकाणी २५० खाटा उपलब्ध करण्यात आल्या असून या रुग्णालयात पालघर जिल्ह्याातील करोनाबाधितांवरही उपचार करण्यात येत आहे. आजमितीस या रुग्णालयात १५० हून अधिक करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. मे महिन्याच्या 21 तारखेपर्यंत ठाणे जिल्ह्याातील करोनाबाधितांचा आकडा साडेचार हजारांच्या पार गेला आहे. 

ही बाब लक्षात घेत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनान विविध पावले उचलत आहे. त्यानुसार ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि अप्पर जिल्हाधिकारी वैदही रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने जिल्ह्यात कोव्हिड केअर सेंटर उभारण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. या जोडीला जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून डेडिकेट कोव्हि़ड हेल्थ सेंटर आणि डेडिकेट कोव्हिड हॉस्पिटल देखील तैनात केले आहेत. लवकरच हे सेंटर रुग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज होणार असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

क्लिक करा : स्वतःच्या अंगणात जाऊन जनतेला मदत करावी...बाळासाहेब थोरात यांनी भाजप नेत्यांना सुनावलं.

'या' भागात होणार उपचार
 ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथ या तालुक्यांमध्ये 1 हजार 516 खाटांचे कोव्हिड केअर सेंटरच्या जोडीला 490 खाटांचे डेडिकेट कोव्हिड हेल्थ सेंटर आणि 420 खाटांचे डेडिकेट कोव्हिड हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे. यासाठी शहापूर येथील शिवाजी जोंधळे महाविद्यालय, भिवंडीतील प्रेसिडेन्सी शाळा, भिनार आश्रम शाळा, मुरबाडमधील एनटीटीइपी इंजिनिअर कॉलेज, कल्याण येथील नारायणी शाळा तर अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर येथील बीएसयूपी (सोनिवली), डेंटल सायन्स रिसर्च सेंटर (शान डेंटल कॉलेज) आदी विविध संस्थामध्ये कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. 
 
कोविड सेंटर म्हणजे काय?
    ताप, सर्दी, खोकला अशी करोनाची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांवर कोव्हिड सेंटरमध्ये उपचार केले जातात. त्यानंतर या ठिकाणी दाखल करण्यात येणाऱ्या रुग्णांची कोरोना तपासणी केली जाते. रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास रुग्णाची रवानगी करोना रुग्णालयात करण्यात येते. तसेच निगेटिव्ह आल्यास रुग्णाला घरी सोडले जाते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid Care Centers in all the five talukas of Thane District