मुंबई-पुणे प्रवास करायचाय? माहिती घेऊन बाहेर पडा! सुरू आहे ...या प्रोजेक्टवर काम

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 May 2020

  • एमएसआरडीसीकडून ‘मिसिंग लिंक’ या प्रोजेक्ट अंतर्गत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खालापुर टोलनाका नंतरच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
  • त्यामुळे 21 मे पासून सोमवार ते शुक्रवार दरम्यान दुपारी 12 वाजता अर्ध्या तासासाठी व त्यानंतर दुपारी 3.30 वाजता एक तासासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील दोन्ही बाजुकडील वाहतुक थांबविण्यात येणार आहे.

नवी मुंबई : एमएसआरडीसीकडून ‘मिसिंग लिंक’ या प्रोजेक्ट अंतर्गत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खालापुर टोलनाका नंतरच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी नियंत्रीत स्फोट घडविण्यात येणार आहेत. यादरम्यान कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून 21 मे पासून सोमवार ते शुक्रवार दरम्यान दुपारी 12 वाजता अर्ध्या तासासाठी व त्यानंतर दुपारी 3.30 वाजता एक तासासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील दोन्ही बाजुकडील वाहतुक थांबविण्यात येणार आहे. 

ही बातमी वाचली का? स्वतःच्या अंगणात जाऊन जनतेला मदत करा;  बाळासाहेब थोरातांनी भाजप नेत्यांना सुनावलं!

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खालापुर टोलनाका नंतर येणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हाती घेण्यात आले आहे. सोमवार ते शुक्रवार या कालावधीत दरदिवशी दुपारी 12 ते 12.30 व 3.30 ते 4.30 या वेळेत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील दोन्ही बाजुकडील वाहतुक थांबविण्यात येणार आहे. 

ही बातमी वाचली का? मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे सासरे दादा सामंत यांची आत्महत्या...

या कालावधीत कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी वाहतुक थांबविण्यात येणार असल्याचे महामार्ग पोलीस विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पुण्याच्या दिशेने जाणारी वाहने खालापुर टोल नाक्यावर तर मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने किमी क्रंमांक 39.500 येथे थांबविण्यात येणार आहेत. या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai-Pune expressway closed for an hour and a half