मुंबईत रूग्ण दुपटीचा कालावधी 99 दिवसांवर तर रिकव्हरी रेट 88 टक्क्यांवर

मिलिंद तांबे
Tuesday, 20 October 2020

मुंबईत 632 इमारती आणि झोपडपट्टया कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 9,546 इतकी आहे.

मुंबई, ता. 20 : मुंबईत आज 1,090 रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,44,262 झाली आहे. मुंबईत आज 45 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 9,821 वर पोचला आहे. मुंबईत आज 1,470 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2,14,375 रूग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 88 टक्के इतका झाला आहे.

बाधित रूग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 11,602 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. त्यामुळे कोविड कोळजी केंद्रात दाखल कऱण्यात येणा-यांची संख्या देखील वाढत असून आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 1,074 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले.

महत्त्वाची बातमी : शिवसेनेचा क्रमांक घसरला, राजकीय पक्षांच्या वार्षिक प्रगतीपुस्तकात कोण अव्वल ?

मुंबईत 632 इमारती आणि झोपडपट्टया कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 9,546 इतकी आहे.

मुंबईत आज नोंद झालेल्या 45 मृत्यूंपैकी 29 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 27 पुरुष तर 18 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 45 रुग्णांपैकी एकाचे वय 40 च्या खाली होते. 11 रुग्ण 40 ते 60 वर्षादरम्यान होते तर 33 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते. 

महत्त्वाची बातमी : आता N95 मास्क मिळणार 19 ते 49 रुपयांपर्यंत, दुपदरी आणि तीन पदरी मास्क 4 रुपयांना

आज 1470 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 2,14,375 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर 99 दिवसांवर गेला आहे. तर 19 ऑक्टोबरपर्यंत एकूण 12,74,754  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 13 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 0.70 इतका आहे. 

covid doubling rate of mumbai reached 99 days recovery rate reached eighty eight percent


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid doubling rate of mumbai reached 99 days recovery rate reached eighty eight percent