
कोविड रूग्णांना संसर्ग झाल्यापासून 14 ते 90 दिवसांच्या आत मनोविकाराची समस्या सतावत असल्याचे नुकत्याच झालेल्या लॅन्सेट अभ्यासात आढळले आहे. मनोविकाराची समस्या जाणवण्याचे प्रमाण 18.1 टक्के एवढे आहे.
मुंबई: कोविड रूग्णांना संसर्ग झाल्यापासून 14 ते 90 दिवसांच्या आत मनोविकाराची समस्या सतावत असल्याचे नुकत्याच झालेल्या लॅन्सेट अभ्यासात आढळले आहे. मनोविकाराची समस्या जाणवण्याचे प्रमाण 18.1 टक्के एवढे आहे.
कोविड होऊन गेल्यावर रुग्णांचे भाव विश्व ढवळून निघते. रुग्णांना त्या धक्क्यातून सावरण्यासाठी डॉक्टरांना ही मोठे प्रयत्न करावे लागत असल्याचा अनुभव डॉक्टर सांगत आहेत. कोविड उपचारादरम्यान सोशल जीवनापासून तुटल्यामुळे विचित्र मानसिक परिणाम रुग्णांवर होत आहेत. कोविड उपचारात सुचविण्यात आलेलं आयसोलेशन हे रुग्णांना सक्ती वाटत असल्याची तक्रार डॉक्टर समोर मांडताना आढळले. त्यातून रुग्णामध्ये एकाकीपणाची भावना वाढली असल्याचे निरीक्षण हा अहवाल मांडत आहे. याविषयी बोलताना डॉ. जलील पारकर हे उपचारासाठी आलेल्या पल्मोनोलॉजिस्ट डॉक्टरचे उदाहरण देतात. हे डॉक्टर ज्येष्ठ असून ते त्यांच्या विषयात गाढे अभ्यासक आहेत. मात्र, कोविडचा संसर्ग झाल्याचे माहित झाल्यावर ते देखील प्रभावित झाले होते. त्यांना विषाणू बद्दल संपूर्ण माहिती होती.
अधिक वाचा- खासगी बसवर कठोर कारवाई करा, कोविड 19 च्या नियमांची पायमल्ली
कोविड विषाणू केवळ रुग्णाच्या फुफ्फुसांनाच उद्ध्वस्त करत नसून रुग्णावर चहू बाजूंनी हल्ला करतो. डॉ. जलील पारकर हे दिवंगत बाळासाहेब ठाकरे, अभिनेते दिलीपकुमार आणि संजय दत्त अशा नामांकित व्यक्तींवर उपचार करणारे डॉक्टर आहेत. अशा तज्ज्ञ डॉक्टरांनी कोविड उपचारांत रुग्णांवर होणाऱ्या परिणामांचे अनुभव सांगितले. कोविड बाबत अनामिक भय रुग्णांमध्ये निर्माण होत असल्याने आता भीती व्यक्त केली जात आहे.
अधिक वाचा- 8 महिन्यांनंतर उघडली मंदिरांची दारं, भाजप नेत्यांकडून श्रेयवादाची लढाई
-------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Covid patients experience psychosis within 14 to 90 days of infection