covid hospital
covid hospitalesakal

COVID-19: मुंबईकर चिंतेत; रुग्णालयात दाखल होणाऱ्यांच्या संख्येत गंभीर वाढ

ऑगस्टच्या पहिल्या दोनच आठवड्यात अचानक ही मोठी वाढ झाली आहे.
Published on

कोरोना प्रतिबंधाचे निर्बंध काहीसे शिथिल झाले असतानाच मुंबईतल्या कोरोना परिस्थितीबद्दल गंभीर माहिती समोर आली आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून दुपटीनं वाढ झाली आहे. गेल्या सात दिवसांत ही अकस्मित आणि मोठी वाढ झाली आहे. (Covid 19 Updates in Mumbai)

covid hospital
ओमिक्रॉनची दहशत कायम; जिनोम सिक्वेन्सिंगच्या अहवालातील धाेका

कोरोना रुग्णांमध्ये अचानक झालेली ही वाढ गंभीर आहे. यासाठी ओमिक्रॉनचे (Omicron) नवे व्हेरिएंट्स जबाबदार आहेत की नाही, याबद्दल डॉक्टरांनाही ठोस माहिती नाही. मात्र ही अचानक वाढ जरी झाली असली तरी मृत्यूचं प्रमाण तुलनेनं कमी आहे. मंगळवारी म्हणजे १६ ऑगस्ट रोजी मुंबईतल्या विविध रुग्णालयांमध्ये ४०० पेक्षा जास्त रुग्ण दाखल करण्यात आले आहे. तर १ ऑगस्ट रोजी २०७ रुग्ण दाखल झाले होते.

अंधेरीतल्या सेव्हन हिल्स या विशेष कोविड रुग्णालयामध्ये ही वाढ ठळकपणे दिसून आली आहे. अचानक २१२ रुग्ण वाढले आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात रुग्णालयात साधारण १०० रुग्ण दाखल होते. ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात मुंबईतल्या कोरोना (Covid 19) रुग्णांची संख्या ८,३५९ होती. जुलैच्या शेवटच्या दोन आठवड्यांत ही संख्या ४,४८३ इतकी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com