मुंबई पालिकेच्या दवाखान्यांसह रुग्णालयात होणार कोविड चाचणी

मुंबई पालिकेच्या दवाखान्यांसह रुग्णालयात होणार कोविड चाचणी

मुंबईः  मुंबई महागर पालिकेच्या दवाखान्यांसह रुग्णालयात 244 ठिकाणी मोफत कोविड चाचणी होणार आहे. नागरिकांना विभागीय हेल्पलाईन तसेच 1916 या हेल्पलाईनवरुन जवळच्या केंद्रांची माहिती मिळू शकते.

संशयित रुग्णांची चाचणी सुलभ व्हावी म्हणून पालिकेने दवाखान्यांमध्ये कोविड चाचण्या सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. सोमवारपासून ही चाचणी सुविधा सुरु होणार आहे. दवाखाने, रुग्णालये अशा 244 ठिकाणी सकाळी 10 ते 12 या वेळेत चाचण्या करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. यामुळे संशयित रुग्ण ज्या प्रभागात राहतो त्याच परिसरात ही चाचणी होणार आहे.

चाचणी केंद्राची संख्या वाढल्याने गर्दीही कमी होईल असेही सांगण्यात आले. काही ठिकाणी आरटीपीसीआर आणि काही ठिकाणी ॲण्टिजेन चाचण्या होणार आहेत. पालिकेची काही रुग्णालये, कोविड केंद्रात चाचणी होते.

तसेच काही ठिकाणी चाचणी केंद्रही सुरु करण्यात आले आहेत. शहरातील 54 खासगी प्रयोग शाळांमध्येही चाचणी होत आहे. त्यासाठी घरी येऊन चाचणी करायची झाल्यास 1800 रुपये आणि प्रयोग शाळेत चाचणी केल्यास 1400 रुपये असे शुल्क राज्य सरकारने निश्‍चित केले आहे. दिवाळी नंतर कोविडचे रुग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन चाचण्याची संख्या वाढविण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.  याबाबतची अधिक माहिती http://stopcoronavirus.mcgm.gov.in या संकेत स्थळावर मिळू शकेल.

---------------------

(संपादनः पूजा विचारे)

Covid test will be done hospitals with Mumbai BMC Hospitals

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com