esakal | १९४० आधी न्यूमोनियावर जसे उपचार व्हायचे तसे उपचार आता कोरोनासाठी? सुरु आहे मोठं संशोधन...
sakal

बोलून बातमी शोधा

१९४० आधी न्यूमोनियावर जसे उपचार व्हायचे तसे उपचार आता कोरोनासाठी? सुरु आहे मोठं संशोधन...

"१९४० आधी न्यूमोनियावर लागू होतील अशी कोणतीही औषधं उपलब्ध नव्हती. अशात न्यूमोनिया रुग्णांवर रेडिएशन थेरेपीचा वापर केला जायचा" 

१९४० आधी न्यूमोनियावर जसे उपचार व्हायचे तसे उपचार आता कोरोनासाठी? सुरु आहे मोठं संशोधन...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात मोठ्या प्रमाणात संशोधन सुरु आहे. संशोधक कोरोनाला कसं रोखता येईल, कोरोना संसर्गावर कसं नियंत्रण मिळवता येईल यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करतायत. कुणी नाकावाटे दिल्या जाणाऱ्या औषधांची टेस्टिंग करतंय, कुणी कॅन्सरवरील औषधं तपासून पाहतोय, कुणी स्टीम थेरेपीवर काम करतयंत तर कुणी लसींच्या चाचण्या सुरु केल्यात. अशात आता आणखी एक मोठं संशोधन पुढे येताना पाहायला मिळतंय. महत्त्वाची बाब म्हणजे हे संशोधन इतर देशांमध्ये नाही तर भारतात सुरु आहे. 

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजेच एप्म्स ने आता रेडिएशन थेरेपीवर संशोधन करण्यास सुरवात केली आहे. रेडिएशन थेरेपीद्वारा रुग्णांमधील न्यूमोनियाचा प्रभाव कमी करण्यावर शोध सुरु करण्यात आलाय. याद्वारा कोरोना रुग्णांना फायदा होऊ शकतो असं बोललं जातंय.   

मोठी बातमी - पालिकेच्या हेल्पलाईनवर वाढले 'चिंतेचे कॉल'! कोव्हिड महामारीमुळे भीतीमध्ये भर
   
या प्रोजेक्टचे प्रिन्सिपल इन्वेस्टीगेटर आणि एम्सचे रेडिएशन आणि ऑन्कोलॉजी डिपार्टमेंटचे मुख्य डी एन शर्मा यांनी याबाबत माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार शनिवारी ऑक्सिजन सपोर्टवरील दोन कोरोना रुग्णांना रेडिएशन थेरेपी दिली गेली. या दोघांचं वय हे ५० वर्षांवर आहे. या कोरोना रुग्णांना रेडिएशन थेरेपी दिल्यानंतर आता त्यांचा ऑक्सिजन सपोर्ट हटवण्यात आला आहे.   

डॉक्टर शर्मा यांच्या माहितीप्रमाणे खरंतर कॅन्सरच्या रुग्णांना डोसेसमध्ये रेडिएशन थेरेपी ट्रीटमेंट दिली जाते याच पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांना देखील कोरोना रेडिएशन थेरेपी देण्यात आली. ज्या रुग्णांना कोरोना रेडिएशन थेरेपी दिली गेली त्यांच्यावर कोणतेही साईड इफेक्टस दिसून आलेले नाहीत. डॉक्टर शर्मा यांच्या माहितीनुसार १९४० पर्यंत न्यूमोनियावर कोणतंच अँटिबायोटिक औषध उपलब्ध नव्हतं, यावेळी न्यूमोनियावर उपचारांसाठी रेडिएशन थेरेपी वापरली जायची. 

मोठी बातमी - वैद्यकीय परिक्षा रद्द करा; अन्यथा आरोग्यसेवा कोलमडण्याची शक्यता... वाचा सविस्तर...

डॉक्टर शर्मा यांच्या माहितीप्रमाणे एकूण ८ कोरोना रुग्णांना अशाप्रकारे रेडिएशन थेरेपी दिली जाणार आहे. यानंतर यांचे जे निष्कर्ष येतील त्यावर विश्लेषण केलं जाईल. 

for covid19 patients radiation therapy is now used as a scientific research

loading image
go to top