कफ परेड येथील सेंट्रल पार्कला कोव्हिडचा फटका; निधीची चणचण असल्याने प्रकल्प लांबणीवर

कफ परेड येथील सेंट्रल पार्कला कोव्हिडचा फटका; निधीची चणचण असल्याने प्रकल्प लांबणीवर
Updated on


मुंबई  : कफ परेड येथील समुद्रात भरणी टाकून न्यु यॉर्कच्या धर्तीवर सेंट्रल पार्क बनवण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपासून कागदावरच राहीला आहे. कोविड तसेच स्थानिक मासेमारांचा विरोध यामुळे हा प्रकल्प लांबणीवर पडला आहे.2023 पर्यंत महानगर पालिकेला हा प्रकल्प पुर्ण करायचा होता. मात्र, कोविड मुळे महापालिकेच्या उत्पन्नात आलेली तुट लक्षात या प्रकल्पावर पुढील वर्षभरतरी कोणतेही काम होण्याची शक्‍यता कमीच आहे.

महानगर पालिकेने विकास आराखड्यात या 300 एकरच्या सेंट्रल पार्कसाठी समुद्राच आरक्षीत केला होता. हे पार्क उभारताना समुद्रातील भरणीचा परीणामाचा अभ्यास करण्यासाठी गोव्याच्या समुद्र विज्ञान संस्था राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, समुद्रात होणाऱ्या सर्वेक्षणाला 2018 मध्ये कफ परेड कोळीवाड्यातील मासेमारांनी विरोध केला होता. त्यानंतर हे सर्वेक्षण होऊ शकलेले नाही. आता, कोविड काळात ही फाईलच पुढे सरकलेली नाही.
पालिकेच्या विकास नियोजन विभागाकडून समुद्रात भरणी करुन तो भुखंड उद्यान विभागाला हस्तांतरीत करण्यात येणार होता. उद्यान विभाग नंतर त्यावर सेंट्रल पार्क साकारणार होते. मात्र, कोविड काळात या प्रकल्पावर कोणतेही काम झालेले नसल्याचे विकास नियोजन विभागाच्या वरीष्ट अधिकाऱ्याने सांगितले. महापालिकेने हे पार्क 2023 पर्यंत उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कोविड मुळे महानगर पालिकेच्या उत्पन्नातही घट झाली आहे. त्यामुळे आता पुढील वर्षीही यात कोणतेही काम होण्याची शक्‍यता कमी आहे.

काय होणार होते
समुद्रात भरणी घालून 300 एकरच्या भुखंडावर करमणुक मैदान,खेळाचे मैदान तसेच उद्यान तयार करण्यात येणार होते.

मेट्रो रेल्वेचा कुलाबा वांद्रे सिप्झ हा तीसरा टप्पा भुयारी असून खोदकामात निघणारा खडक,माती राडारोड समुद्रात टाकून हे पार्क तयार करण्यात येणार होते. मात्र, आता मेट्रोच्या या टप्प्यासाठीचे खोदकाम पुर्ण होत आले आहे.

मासेमारांचा का विरोध
हे पार्क एनसीपीए आणि गिता नगर दरम्यान असलेल्या समुद्रात टाकून उभारण्यात येणार होते.कफ परेड कोळीवाड्यातील मासेमारांचा मासेमारीसाठी जाण्याचा हाच मार्ग आहे. तसेच, त्यांच्या बोटीही या परीसरात उभ्या असतात.त्यामुळे विरोध करण्यात आला होता.

Covids blow to Cuff Parades Central Park Project postponed due to lack of funds

--------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com