File Photo
File Photo

धक्कादायक! कीटकनाशके खायला घातल्याने गायी, कुत्र्याचा मृत्यू

Published on

नेरळ : नेरळ गावात लॉकडाऊनमध्ये जनावरांना कीटकनाशके खायला घालून मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. त्यातून दोन गायी आणि एका वासराला वाचविण्यात यश आले असून दोन गायी आणि एका कुत्र्याचा मृत्यू झाला आहे.

नेरळ गावातील टपाल कार्यालयाच्या मागील मैदानात काही जनावरे बेशुद्ध पडल्याची माहिती 15 मे रोजी गावकऱ्यांनी मिळाली. त्यानंतर नेरळ गावातील प्राणीमित्र गणेश परब, श्रीहरी काळे, प्रज्ञेश खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तेथे तोंडाला फेस येत असलेल्या चार गायी, एक वासरू आणि एक कुत्रा त्यांना दिसून आले. त्यामुळे तरुणांनी तत्काळ पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधला.

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ प्रसाद पाटील हे कर्मचाऱ्यांसोबत मैदानात पोहचले. तेथे बेशुद्ध पडलेल्या गायींची तपासणी केली असता त्या सर्व प्राण्यांच्या तोंडाला आलेला फेस हा फॉरेट कीटकनाशक त्यांनी प्राशन केल्याने आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर डॉ पाटील यांनी सर्व प्रयत्न पणाला लावून दोन गायी आणि एका वासराचे जीव औषध उपचार करून वाचवले.

Cows, dogs die due to pesticides in Neral

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com