कॉक्स अँड किंग्स गैरव्यवहार प्रकरणः अकाउंट मॅनेजरचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ सापडला

अनिश पाटील
Sunday, 18 October 2020

कॉक्स अँड किंग्सच्या वरिष्ठ अधिका-यांसोबत काम करणा-या अकाउंट मॅनेजरचा मृतदेह टिटवाळा रेल्वे रुळांवर सापडला. कॉक्स अँड किंग्स गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचलनालय (ईडी) आणि आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई: कॉक्स अँड किंग्सच्या वरिष्ठ अधिका-यांसोबत काम करणा-या अकाउंट मॅनेजरचा मृतदेह टिटवाळा रेल्वे रुळांवर सापडला. कॉक्स अँड किंग्स गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचलनालय (ईडी) आणि आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे.

12 ऑक्टोबरला हा मृतदेह सापडला होता. पण त्याची ओळख पटली नव्हती. शनिवारी अखेर नौपाडा पोलिसांनी सागर देशपांडेच्या मृतदेहाची ओळख पटवली. ठाण्याचा रहिवासी असलेला सागर 11 ऑक्टोबरपासून बेपत्ता होता. 12 ऑक्टोबरला सकाळी साडेसहाच्या सुमारास मृतदेहाबाबत कल्याण रेल्वे पोलिसांना दूरध्वनी आला होता. त्याला तात्काळ रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी अपमृत्यूची नोंद केल्यानंतर त्याचा छायाचित्र सर्व पोलिसांना पाठवण्या आला होता. त्यावेळी नौपाडा पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. हा अपघात आहे की आत्महत्या याबाबत अद्याप स्पष्ट झाले नसून आम्ही सर्व बाजूंनी तपास करत असल्याचे एका पोलिसाने सांगितले. 

पोलिस सध्या सागरच्या कारची माहिती घेत आहे. याशिवाय त्याच्या कुटुंबियांकडूनही माहिती घेण्यात येणार आहे. सागर देशपांडे हा कॉक्स अँड किंग्सचे वरिष्ठ अधिकारी अनिल खंडेलवाल, नरेश जैन यांच्यासोबत काम करायचा. येस बँक प्रकरणी तपास करताना ईडीने याप्रकरणी कॉक्स अँड किंग्सला देण्यात आलेल्या कर्जाच्या रकमेत अनिमितता असल्याचे निष्पन्न झाले होते.

अधिक वाचाः  केईएम-नायरमध्ये 163 जणांना कोव्हिशील्ड लस, अद्याप दुष्परिणाम नाही

3642 कोटींचा हा गैरव्यवहार असून याबाबत ईडीने दिलेल्या माहितीनुसार, मालवर्न ट्रॅव्हल्स लि.युके यांचे 493 कोटी रुपयांचे थकीत कर्ज आहे. त्सााठी आरबीएस बँक, युके, स्टेट बँक ऑफ इंडिया, युके यांची बनावट बँक स्टेटमेंट जमा करण्यात आली होती. याशिवाय ऑडिटरचेही बनावट प्रमाणपत्र सादर करण्यात आले होते. त्याच्या सहाय्याने येस बँकेकडून कर्ज घेण्यात आले होते. कॉग्स अँड किंग्स या कंपनीचेही त्यांच्या परदेशी सहाय्यकांचे बनावट बॅलेन्सशीट सादर केले. त्याची माहिती स्टॉक एक्सचेंजला देण्यात आली. त्यासाठी बनावट ग्राहक दाखवण्यात आले. याशिवय कर्ज थकवल्यानंतर फॉरेन्सिक ऑडिट करण्यासाठी व्यवस्थापनाने मदत केली नाही. 

अधिक वाचाः  नवा फोटो शेअर करत कंगना राणावतचा पुन्हा एकदा राज्य सरकारला टोला

याशिवाय कॉक्स अँड किंग्सचा सीएफओ अनिल खंडेलवाल याने 1100 कोटी एका कंपनीमध्ये फिरवले. त्यााबत बोर्डाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. याशिवय कॉग्स अँड किंग्स यांनी हॉलिडे ब्रेक एड्युकेशन लि. कंपनी 4387 कोटींना विकली. त्यातील रक्कम कर्ज फेडण्यासाठी न वापरता कुबेर इन्वेस्टमेंट, मॉरिशिअसमध्ये 15.34 दशलक्ष अमेरिकन डॉलर हस्तांतरीत केले.  त्या कंपनीवर पीटर केरकरचे नियंत्रण आहे. याशिवाय ईझीगो याच्यातील 150 कोटी रेड काईट प्रा. लि.मध्ये हस्तांतरीत केले. या कंपनी अनिल खंडेलवाल आणि नरेश जैन या दोघांशी संबंधित आहे. ही रक्कम टुरिजम फायनान्स कॉर्पोरेशनचे स्टेक्स खरेदी करण्यात वापरण्यात आले, असा आरोप आहे.

---------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Cox & Kings case Account manager body found near railway tracks


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cox & Kings case Account manager body found near railway tracks