

मुंबई : राज्य शिक्षण मंडळ आणि केंद्रीय माध्यमिक मंडळाची मान्यता घेऊन आपल्या नावापुढे इंटरनॅशनल स्कूल, सैनिकी शाळा, ऑक्सफर्ड स्कूल, ग्लोबल स्कूल, वर्ल्ड स्कूल, युनिव्हर्सल स्कूल आणि कॉन्व्हेन्ट स्कूल असे नाव वापरणाऱ्या आणि त्यासाठीची जाहिरात करून पालकांना फसवणाऱ्या खासगी व्यवस्थापनाच्या शाळांना चाप लागणार आहे. यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून नवीन नियमावली जाहीर केली आहे.