Bullet Train: मोठी घटना! मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर क्रेन कोसळली; रेल्वे सेवेवर परिणाम, अनेक गाड्या रद्द
Mumbai Ahmedabad Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर एक मोठी घटना घडली आहे. मार्गावर काम सुरू असतानाच दुर्घटना क्रेन कोसळल्याचे समोर आले आहे. याचा परिणाम सेवेवर झाला आहे.
अहमदाबाद आणि मुंबई दरम्यान धावणाऱ्या हाय-स्पीड बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे. बुलेट ट्रेनच्या कामादरम्यान अहमदाबादमधील वटवा हाथीजान परिसरातील रोपर पुलाजवळ अचानक एक क्रेन कोसळली. या घटनेने खळबळ उडाली होती. तसेच घबराट पसरली आहे.