क्रॉफर्ड मार्केट दुर्घटनेतल्या आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ, वाचा सविस्तर

क्रॉफर्ड मार्केट दुर्घटनेतल्या आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ, वाचा सविस्तर

मुंबईः क्रॉफर्ड मार्केट परिसरातील जनता हॉटेलसमोर भरधाव कारनं सोमवारी रात्री नऊ जणांना जोरदार धडक दिल्याची गंभीर घटना घडली. या अपघातात पाच जणांचा  मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी चालक आरोपीविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीला ४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

जखमींवर जे.जे रुग्णलयात उपचार सुरू आहेत. भरधाव वेगात असलेल्या या गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सय्यद समीर अली ऊर्फ डिग्गी असं या 46 वर्षीय कार चालकाचे नाव असून त्यालाही दुखापत झाली आहे. समीर विरोधात 304 (2), 279, 337, 427, 308 भादविसह मोटार वाहन कायदा कलम 183 व 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलीम हारून मरेडियाया 33 वर्षीय व्यक्तीच्या तक्रारीवरून याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मरेडिया हे तेथील एका हॉटेलचे व्यवस्थापक असून त्याच्या डोळ्यासमोर हा प्रकार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

क्रॉफर्ड मार्केट परिसरात कायमच खरेदीसाठी नागरिक गर्दी करत असतात. रात्री 9 च्या सुमारास या गर्दीच्या ठिकाणी एका कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले, त्यावेळी त्याच्या भरधाव कारने चार जणांना चिरडले, नईम, सरोज, जुबेडा आणि अन्य एका अनोळखी व्यक्तीचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तर या भीषण अपघातात चार  जण गंभीर जखमी झाले असून मोहम्मद जुही, नदीन अन्सारी, कमलेश, मोहम्मद नदीम अशी या चौघांची नावे आहेत. या सर्वांना तातडीने जवळील जे.जे.रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

त्याच्या भरधाव कारने चार जणांना चिरडले. नईम, सरोज, जुबेडा आणि अन्य एका अनोळखी व्यक्तीचा यात अपघातात मृत्यू झाला होता. मंगळवारी उपचारादरम्यान अपघातात जखमी झालेल्या कमलेश सिंगचाही मृत्यू झाला. तसेच, जखमींमधील एक जण कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आला आहे.

माझे घटनास्थळाजवळच मोबाईलचे दुकान आहे. अपघात झाला तेव्हा मी दुकानात होतो. जोरदार आवाज आल्याने मी बाहेर धाव घेतली तेव्हा कारच्या बोनेटवर दोन महिला पडल्या होत्या. सदानंद कॅफेपासून आरोपी चालक त्या महिलेला कारसोबत फरफटत घेऊन आला होता. त्यांचे पाय मोडले होते. त्यानंतर कारने बॅग विक्रेत्याला धडक दिली.
- असद खालीद कुरेशी, प्रत्यक्षदर्शी

त्याने पाच व्यक्ती नव्हे, पाच कुटुंबांचा मारले 
माझी आई भाजी आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी कारने तिला धडक दिली. बोनेटवर पडल्यानंतर आईने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण, आरोपीने कार थांबवली नाही व माझ्या आईला बोनेटवर घेऊन 100 फूट दूर कार घेऊन गेला. कार हॉटेलच्या गाळ्यावर धडकल्यानंतर थांबली. माझे वडील मी पाच वर्षे असताना वारले होते. तेव्हापासून माझी आई घरकाम करून घर सांभाळत होती. सध्या ती एकटीच कमावती होती. त्यामुळे आरोपीने पाच व्यक्तींना नव्हे तर पाच कुटुंबियांना मारल्याची प्रतिक्रिया मृत सायरा बानू शेख यांचा मुलगा नूर शेखने व्यक्त केली.

माझी आई सरोजा नायडू डोळ्यांचे औषध आणण्यासाठी गेली होती. तिला औषध न मिळाल्यामुळे तिने मला औषध आणण्यासाठी पाठवले. मी औषध आणायला गेलो. त्यावेळी ओळखीच्या झुबैदा यांच्याशी  आई बोलत बसली होती. परत येऊन पाहतो. त्यावेळी दोघीही कारच्या चाकाखाली आल्या होत्या.
- गणेश नायडू

अपघाताच्या दिवशी कमलेश बिर्यानी आणण्यासाठी हॉटेलमध्ये गेला होता. लॉकडाऊनमध्ये हॉटेलमध्ये बसण्याची परवानगी नसल्यामुळे तो बाहेरच उभा होता. तेथे उभा असताना कारने त्याला धडक दिली.
- विनोद सिंग, मृत कमलेश सिंगचे काका

झैबुदा चहा आणण्यासाठी गेली. त्यावेळी नऊ वाजता शेजा-याने अपघाताबद्दलची माहिती मला दिली. मी तेथे गेलो. त्यावेळी माझी बहिण चाकाखाली आली होती. ती श्वास घेत नव्हती. अपघात एवढा भयंकर होता की तिचा जागीच मृत्यू झाला. 
- अली खातून शेख, मृत झुबैदा खानचा भाऊ

(संपादनः पूजा विचारे)

crawford market accident updates accused Sayed sameer remanded police custody till september 4

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com