'आमची चूल पेटू द्या'; ठाण्यात एक पडदा चित्रपटगृहाच्या मालकांचे आंदोलन

राहूल क्षीरसागर
Thursday, 3 September 2020

राज्य शासनाने टाळेबंदी शिथिल करत सर्व व्यवहार पूर्वपदावर आणण्यासाठी बाजारपेठा, व्यापारी संकुले आणि मॉल खुले करण्यास परवानगी दिली आहे; मात्र अद्याप राज्यातील एक पडदा चित्रपटगृह उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे एक पडदा चित्रपटगृहांच्या मालकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.

ठाणे : राज्य शासनाने टाळेबंदी शिथिल करत सर्व व्यवहार पूर्वपदावर आणण्यासाठी बाजारपेठा, व्यापारी संकुले आणि मॉल खुले करण्यास परवानगी दिली आहे; मात्र अद्याप राज्यातील एक पडदा चित्रपटगृह उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे एक पडदा चित्रपटगृहांच्या मालकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे लवकरात लवकर एक पडदा चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी मिळावी यासाठी ठाण्यातील चित्रपटगृह मालकांनी बुधवारी आंदोलन करीत चित्रपटगृहे खुली करण्याची मागणी केली. 

ही बातमी वाचली का? अनेकांच्या नोकऱ्या गेल्या; आहेत त्यांना टिकवण्याचे आव्हान, आतातरी लोकल सुरू करा! सोशल चळवळीला सुरुवात

आर्थिक कोंडीमुळे मुंबईतील ताडदेव गंगा-जमुना आणि गीरगाव येथील सेंटर प्लाझा या एक पडदा चित्रपटगृहाच्या मालकांवर चित्रपटगृह बंद करण्याची वेळ ओढवली आहे. जून महिन्यापासून राज्य सरकारने टाळेबंदीमध्ये शिथिलता देण्यास सुरुवात केली असून सध्या टाळेबंदी शिथिलतेचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. कोरोनामुळे ठप्प झालेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी राज्य सरकारने बाजारपेठा, व्यापारी संकुले आणि मॉल खुले करण्यास परवानगी दिली आहे; मात्र एक पडदा चित्रपटगृह खुले करण्यास आद्याप परवानगी दिलेली नाही. 

ही बातमी वाचली का? नालासोपारा दुर्घटना! 'सकाळ'ने आधीच वेधले होते धोकादायक इमारतींकडे लक्ष 

त्यामुळे ठाण्यातील एक पडदा चित्रपटगृहाच्या मालकांनी एकत्र येत बुधवारी आंदोलन केले. या वेळी चित्रपटांचे पोस्टर, नावे आणि चित्रपटातील काही संवाद वापरून आकर्षक फलक तयार केले होते. चित्रपटगृह खुली करण्याच्या मागणीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे फलक दाखवून आनोख्या पद्धतीने आंदोलन केले. या वेळी त्यांनी "आमची चूल पेटू द्या' अशा घोषणा देण्यात आल्या. 
------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The agitation of the owners of a one-screen cinema in Thane