Badlapur News : स्त्री जगली तरच सृष्टी जगेल, मुलींच्या जन्माचे स्वागत करणाऱ्या, किरण भोईर यांचे स्त्री जन्माशी अतूट नाते!

बदलापूर पश्चिम येथे राहणारे किरण भोईर व त्यांची पत्नी डॉ. रचना भोईर या दाम्पत्यांना स्त्री जन्माविषयी विशेष आदर आणि प्रेम आहे.
Kiran Bhoir and Dr Rachana Bhoir
Kiran Bhoir and Dr Rachana Bhoirsakal

- मोहिनी जाधव

बदलापूर - ज्या स्वराज्यात स्त्री ला मातेचे स्वरुप देऊन, तिचा सन्मान करण्याची परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. त्या शिवरायांच्या विचारांचे मनावर प्रभुत्व पडलेल्या आणि शिवजयंतीचे औचित्य साधून गेल्या वर्षभरापासून बदलापुरात प्रत्येक घरात जन्माला येणाऱ्या मुलींचे स्वागत करण्याची परंपरा माजी नगरसेवक तथा समाजसेवक किरण भोईर यांनी सुरु केली असून, आत्ता पर्यंत ५०० पेक्षा जास्त नवजात मुलींचे स्वागत किरण भोईर व त्यांची पत्नी रचना भोईर या दांपत्याने केले आहे. यावेळी वर्षभरासाठी मुलींच्या संगोपनासाठी लागणारे साहित्य, इतर सर्व प्रकारची मदत भोईर दाम्पत्य पुरवत आहे.

बदलापूर पश्चिम येथे राहणारे किरण भोईर व त्यांची पत्नी डॉ. रचना भोईर या दाम्पत्यांना स्त्री जन्माविषयी विशेष आदर आणि प्रेम आहे. एकीकडे देशात अनेक ठिकाणी स्त्रीभ्रूण हत्या, स्त्रियांवर अत्याचार होणाऱ्या घटना आपण रोज ऐकतो, पाहतो मात्र स्त्री ही विश्वाची उत्पत्ती करणारी शक्ती असल्याची जाणीव असून, भोईर दांपत्य मात्र स्त्री जन्माचा जागर करत आहेत.

आपण जुन्या चुकीच्या चालीरीती बाजूला सारुन नवा पायंडा रचू या भावनेतून या दांपत्याने बदलापूर शहरात प्रत्येक दिवशी जन्माला येणाऱ्या मुलीचे स्वागत करण्याचे ठरवले. २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून या संकल्पनेला सुरुवात झाली. आणि बघता बघता वर्षभरात पाचशेहून अधिक मुलींच्या जन्माचे स्वागत किरण भोईर आणि रचना भोईर यांनी केलं.

यासाठी शहरातील प्रत्येक हॉस्पिटल मध्ये त्यांनी डॉ. व कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून, आपल्या रुग्णालयात ज्या बाळंतिण महिलेने मुली ला जन्म दिला आहे त्याची माहिती घेऊन, त्या मुलींच्या पालकांना त्या बाळाचे संगोपन करण्यासाठी लागणारे वर्षभराचे साहित्य, कपडे, तसेच सर्वोतोपरी मदत देऊन, किरण भोईर आणि रचना भोईर हे मुलीच्या जन्माचे स्वागत करतायत.

खरंतर मुलीच्या जन्माचे सार हे मोठे आहे आणि ते समजण्यासाठी मुलीचे पालक होणे गरजेचे आहे. जन्माला आलेल्या मुलीचे पालक म्हणून तुम्ही देखील हा आनंद व्यक्त केला पाहिजे, अशी जाणीव भोईर दाम्पत्य या नवजात मुलींच्या पालकांना करुन देतात. याचबरोबर मुलीच्या संगोपनात काही अडचणी आल्या तरी, आमच्यापर्यंत या असेही आवाहन त्यांनी या पालकांना केले आहे.

त्यांच्या या संकल्पनेचे कौतुक रुग्णालयातील डॉ. कर्मचारी, समाजातील अनेक नागरिक, व नवजात मुलींचे पालक करत आहेत. आम्हाला यातून खऱ्या अर्थाने समाधान मिळते. जगात ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून जरी साजरा करण्यात येत असला तरी, जेव्हा आपल्या देशात जन्माला येणाऱ्या मुलीचे स्वागत होईल, स्त्रीभ्रूण हत्या थांबेल, स्त्री अत्याचार रोखला जाईल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या देशात महिला दिनाचा जागर होईल असे किरण भोईर यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com