मरणानंतरही ‘स्मशान’यातना!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मे 2019

जन्मानंतर मृत्यू कुणाला चुकत नाही. मात्र आयुष्यभराच्या जगण्याच्या संघर्षानंतर मरणाचे सोपस्कार तरी सुस्थितीत पार पडावेत, ही प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, विरार येथील पारोळ-भिवंडी मार्गालगत असणाऱ्या माजीवली गावात मरणानंतरही मृतदेहाला यातना सहन कराव्या लागत आहेत.

वसई - जन्मानंतर मृत्यू कुणाला चुकत नाही. मात्र आयुष्यभराच्या जगण्याच्या संघर्षानंतर मरणाचे सोपस्कार तरी सुस्थितीत पार पडावेत, ही प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, विरार येथील पारोळ-भिवंडी मार्गालगत असणाऱ्या माजीवली गावात मरणानंतरही मृतदेहाला यातना सहन कराव्या लागत आहेत. स्मशानभूमी नसल्याने रस्त्याकडेलाच अंत्यविधी करण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे.

गावातील मधुकर चोघळा यांचे नुकतेच निधन झाले. मात्र स्मशानभूमी नसल्याने रस्त्याच्या बाजूलाच अंत्यविधी करण्याची वेळ नातेवाईकांवर आली. अन्य गावात स्मशानभूमी, शहरात आधुनिक सुविधा असताना आमच्या गावाला स्मशानभूमीपासून वंचित का राहावे लागत आहे, असा उद्विग्न 
सवाल येथील नागरिक प्रशासनाला करत आहेत.

गावातील व्यक्ती मरण पावली, तर त्याचे अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. मात्र प्रशासनाने अद्यापही लक्ष दिले नाही. त्यामुळे उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत आहे. आता तरी प्रशासनाने लक्ष घालून स्मशानभूमी उभारण्यासाठी कष्ट घ्यावेत.
- विजय चोघळा, नागरिक, माजीवली

ठक्कर बाप्पा योजनेतून स्मशानभूमी उभारण्याचा प्रस्ताव केला होता. मात्र जागेअभावी परत आला आहे. आता नव्याने जागा शोधत आहोत.
- वैभव चोघळा, उपसरपंच, माजीवली ग्रामपंचायत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crematorium Problem in Majivali Village Funeral