'त्या' बुकीनं दिलेल्या 5 सिमकार्डचं सचिन वाझेंनी काय केलं? होणार मोठा खुलासा

'त्या' बुकीनं दिलेल्या 5 सिमकार्डचं सचिन वाझेंनी काय केलं? होणार मोठा खुलासा

मुंबईः व्यापारी मनसुख हिरेन हत्या प्रकरणात महाराष्ट्र एटीएसनं दोन आरोपींना अटक केली. त्यामुळे मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचं गूढ उकलल्याचा दावा एटीएस करत आहे. तसंच हिरेन यांच्या हत्या प्रकरणात अटक केलेल्या या दोन आरोपींचा हात असल्याचा दावाही एटीएसनं केला आहे. दरम्यान आताच समोर आलेल्या माहितीनुसार, या दोन्ही आरोपींना ३० मार्चपर्यंत दहशतवाद विरोधी पथकाच्या विशेष कोठडीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेत.

अटक करण्यात आलेल्या दोघांना आधी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र, चौकशीनंतर त्या दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती एएनआयनं दिली आहे. यात निलंबित पोलिस हवालदार विनायक शिंदे आणि बुकी नरेश गोरे या दोघांना एटीएसनं अटक केली आहे.

नरेश गोरे यानं या प्रकरणात सचिन वाझे आणि विनायक शिंदे यांना ५ अनोळखी व्यक्तींच्या नावे सिमकार्ड दिले होते, अशी माहिती एटीएसनं दिली आहे. आरोपी नरेश गोरे क्रिकेट बुकीचा व्यवसाय करतो. 

विनायक शिंदे हा निलंबित पोलिस कर्मचारी असून 2008 मध्ये वर्सोवा येथे लखन भैय्या चकमकी प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून मे 2020 पासून तो फर्लोवर आहे. तेव्हापासून शिंदे सचिन वाझे यांच्या संपर्कात होता आणि प्रत्येक बेकायदेशीर कामात तो वाझेला मदत करत होता, अशी माहितीही समोर येत आहे.

या दोन्ही आरोपींना ३० मार्चपर्यंत दहशतवाद विरोधी पथकाच्या विशेष कोठडीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेत. आज सकाळी 9 च्या सुमारास या दोघांच्या अटकेची प्रक्रिया सुरू करण्यात आली त्यानंतर दोघांना आज ठाणे न्यायालयात हजर करण्यात आलं. 

या हत्या प्रकरणात या दोघांचा हात असल्याचा ATS  ला संशय आहे. मनसुखचा मृतदेह ज्या दिवशी मुंब्रा रेतीबंदर परिसरात आढळला होता. त्यावेळी हे दोघं घटनास्थळी होते असं ATS च्या सुत्रांकडून समजतेय. या दोघांची हिरेन यांच्या हत्या प्रकरणात नेमकी काय भूमिका होती का? याचा एटीएस तपास करत आहे.

व्यापारी मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्याच्या खाडीत सापडला होता. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ठेवण्यात आलेल्या स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्यामुळे खळबळ उडाली होती. या कारमुळे मनसुख हिरेन यांचं नाव समोर आलं होतं. ही कार त्यांच्या मालकीचं असल्याचं बोललं जातं होतं आणि त्यानंतर त्यांचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. दरम्यान आता या दोन जणांना अटक केल्यानंतर हिरेन प्रकरणात मोठा खुलासा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Cricket bookie naresh gore gave 5 SIM cards Sachin Waze

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com