

Mumbai Youth Sickle Stuck in Head
ESakal
मुंबई : डोक्यात कोयता खुपसलेला असतानाही एक तरुण स्वतः चालत शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात चालत पोहोचल्याचा व्हिडिओ सोमवारी समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. गंभीर दुखापत असूनही तो मोबाईलचा वापर करताना दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. शस्त्रक्रिया करून डोक्यातून कोयता काढण्यात आला असून, सध्या प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.