

Youth Pushed off from local train
ESakal
मुंबई : मुंबईत लोकलमध्ये गेल्या काही दिवसांपासून किरकोळ वादामुळे मोठ्या दुर्घटना घडत आहेत. मागील आठवड्यात माहीम-वांद्रे दरम्यान लोकलमधील वादामुळे एका ६५ वर्षीय व्यक्तीला जीव गमवावा लागला होता. मुंबई लोकलमधील ही घटना निवळली नसून पुन्हा अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. लोकलमध्ये दाराजवळ उभं राहिल्यामुळे झालेल्या वादात एका व्यक्तीने तरुणाला लाथ मारून ढकलल्याचे समोर आले आहे.