Mumbai Crime News : मंत्रालयातील उच्च स्तरीय अधिकाऱ्याच्या मुलीसमोर हस्तमैथुन; आरोपी अटकेत

घटना घडली तेव्हा पीडित मुलीच्या मोबाईलचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू होते...
crime Accuse arrested masturbating in front of daughter of high level officer ministry mumbai
crime Accuse arrested masturbating in front of daughter of high level officer ministry mumbaiesakal

मुंबई : मंत्रालयातील उच्च स्तरीय अधिकाऱ्याच्या मुलीसमोर हस्तमैथुन करणाऱ्याला ताडदेव पोलिसांनी अटक केली आहे. अब्दुल अहमद गौस मोहम्मद राहिनी या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

सोमवारी रात्रीच्या घटनेत आरोपी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मुलीच्या जवळ गेला. यानंतर चालकाने तिच्यासमोर अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. ही घटना घडली तेव्हा पीडित मुलीच्या मोबाईलचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू होते, त्यामुळे संपूर्ण घटनेचे रेकॉर्डिंग झाले.

तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली आहे. अब्दुल अहमद गौस मोहम्मद राहिनी असे 23 वर्षीय आरोपीचे नाव आहे. 6 जानेवारी रोजी रात्री 9 वाजता पीडित मुलगी हाजी अली येथून घरी जात होती.

त्याचवेळी एका कार कंपनीत पिक-अप आणि ड्रॉपचे काम करणाऱ्या चालकाने मुलीला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने जवळ बोलावले आणि अश्लील कृत्य केले. मुलीने आरडाओरडा करताच आरोपीने घटनास्थळाहून पळ काढला.

नंतर ही बाब गांभीर्याने घेत पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. परिसरातील सर्व सीसीटीव्ही स्कॅन केल्यानंतर चालकाने वाहन अंधेरी येथील कार्यालयात नेल्याचे पोलिसांना समजले. रात्रीची वेळ असल्याने कार्यालय बंद होते.

त्यामुळे पोलिसांना माहिती मिळू शकली नाही.आरोपी अब्दुलचा मोबाईलही बंद होता. रात्रभर कार्यालयाबाहेर आणि अन्य दोन ठिकाणी पोलिसांचा पहारा होता. सकाळी आरोपी चालक कार्यालयात पोहोचताच पोलिसांनी त्याला अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com