नमाजासाठी जमलेल्या 600 हून नागरिकांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

कोरोना विषाणूचा वाढता प्रसार रोखण्यासाठी संपुर्ण देशात रविवारी जनता कर्फ्यु लागू करण्यात आला होता. मात्र, असे असतानाही पनवेल व कळंबोली भागातील शेकडो मुस्लीम बांधवानी रविवारी दुपारी मस्जीदमध्ये नमाज पठणासाठी गर्दी केल्याने एकच खळबळ उडाली होती.

पनवेल : कोरोना विषाणूचा वाढता प्रसार रोखण्यासाठी संपुर्ण देशात रविवारी जनता कर्फ्यु लागू करण्यात आला होता. मात्र, असे असतानाही पनवेल व कळंबोली भागातील शेकडो मुस्लीम बांधवानी रविवारी दुपारी मस्जीदमध्ये नमाज पठणासाठी गर्दी केल्याने एकच खळबळ उडाली होती. पनवेल शहर व कळंबोली पोलिसांनी या 600 हून अधिक नागरिकांवर तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करत 37 लोकांची धरपकड केली. 

ही बातमी वाचली का? ठाणे ग्रामीण भागात सर्र्वत्र शुकशुकाट

कोरोनाच्या संक्रमण रोखण्यासाठी सरकारच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी सर्व प्रकारचे शासकिय उत्सव, सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रम, प्रशिक्षण, मोर्चे, धरणे आंदोलन, इतर गर्दीच्या कार्यक्रमांना पुढील आदेश होईपर्यंत परवानगी देण्यात येऊ नयेत. अशा जिल्हाधिकाऱ्यांनी सुचना दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण देशात रविवारी जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन केले होते. देशभरासह राज्यात नागरिकांनी उत्स्फुर्तपणे या जनता कर्फ्युमध्ये सहभाग नोंदवला. असे असतानाच पनवेल मधील काही मौलवींनी आजान देऊन मुस्लिम बांधवांना नमाजासाठी बोलावून घेतले. त्यामुळे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पवनेलमधील भुसार मोहल्ला मस्जीद व सुफा मस्जीद या दोन्ही मस्जीदमध्ये सुमारे 600 मुस्लिम बांधव जमा झाले. त्याचप्रमाणे तिसऱ्या मस्जीदमध्ये देखील 30-35 मुस्लीम बांधव नमाजासाठी जमा झाले होते.

ही बातमी वाचली का? मुंबईकरांचे भविष्य त्या 402 प्रवाशांच्या हाती
 
याबाबतची माहिती मिळाताच पनवेल पोलिसांनी नमाजासाठी गर्दी केलेल्या मुस्लींम बांधवाना गर्दी न करण्याचे आवाहन करुन त्यांना तत्काळ आपापल्या घरी जाण्याची समज दिली. तर कळंबोलीत देखील काही मुस्लीम बांधवदेखील दुपारी नमाजासाठी जमल्याने कळंबोली पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. पोलिसांनी एकुण 600 पेक्षा अधिक व्यक्तींवर शासकिय आदेशाची अवहेलना करणे, मनाई आदेशाचा भंग करणे, त्याचप्रमाणे जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करुन 37 लोकांची धरपकड केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime against 600 citizens gathered for namaj in Panvel, Kalamboli