माणगावात वाहतूक पोलिसाला जबर मारहाण; 60 ते 70 जणांविरोधात गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 5 January 2021

: 60 ते 70 जणांच्या जमावाने वाहतूक पोलिसावर हल्ला करून त्याला बेदम मारहाण करण्याची घटना सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास माणगावमध्ये घडली

माणगाव  : 60 ते 70 जणांच्या जमावाने वाहतूक पोलिसावर हल्ला करून त्याला बेदम मारहाण करण्याची घटना सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास माणगावमध्ये घडली. निवास साबळे असे या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. साबळे हे क्रीडा संकुल येथून मोटरसायकलवरून जात असताना त्यांना अडवून हा हल्ला करण्यात आला. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

साबळे यांची सोमवारी साप्ताहिक सुट्टी होती. ते क्रीडा संकुलाजवळ रस्त्याच्या कडेला मित्राची वाट पाहत असताना चव्हाणवाडी गावातील रिक्षाचालक आणि त्याच्या गावातील 40 ते 50 जणांनी पूर्वीच्या एका घटनेचा राग मनात धरून विकास मोरे (53), संतोष बाळाराम शिर्के, राजेंद्र मोरे यांच्यासह 60 ते 70 जणांनी त्यांना बाबू आणि हाताबुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण केली. जखमी साबळे यांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या प्रकरणी माणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून 18 आरोपींना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा माणगाव पोलिस शोध घेत आहेत. घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली

crime against traffic police in Mangaon Case filed against 60 to 70 people

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime against traffic police in Mangaon Case filed against 60 to 70 people