ड्रोनचा वापर करणाऱ्या तिघांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

मुंबई - दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर शहरात "ड्रोन'च्या वापरास पोलिसांनी बंदी घातली आहे. चित्रीकरणाच्या सरावासाठी "ड्रोन'चा वापर करणाऱ्या तिघांना बुधवारी गुन्हे प्रकटीकरण कक्ष 11 ने ताब्यात घेतले. राहुल जैस्वाल, राणा सुभाष सिंग आणि विधिचंद शिवनाथ प्रसाद अशी तिघांची नावे आहेत. तिघांनाही चारकोप पोलिसांच्या ताब्यात दिले असून, त्यांच्याकडून पोलिसांनी एक ड्रोन आणि आयपॅड जप्त केला.

उरीच्या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील महत्त्वाच्या शहरांना हाय ऍलर्ट जारी केला होता. सुरक्षेचा विचार करून मुंबई पोलिसांनी शहरात "ड्रोन'च्या वापरास बंदी घातली. ड्रोनचा वापर करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कांदिवली पश्‍चिमच्या चारकोप सेक्‍टर पाच येथे बुधवारी (ता. 19) सकाळी ड्रोन उडवले जात असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण कक्ष 11 च्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पोलिस घटनास्थळी गेले. एका चित्रपटाचे चित्रीकरण ड्रोनने होणार होते. त्याचा सराव म्हणून राहुल आणि राणा हे ड्रोन उडवत होते. त्यांनी पोलिसांची परवानगी न घेताच ड्रोनचा वापर केल्याचे पोलिसांनी सांगितले. ते ड्रोन विधीचंद यांच्या मालकीचे आहे. त्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले.

कुर्ला येथे एका वैमानिकाला मंगळवारी (ता. 18) रात्री दोन ड्रोन हवेत उडत असल्याचे दिसले होते. वैमानिकाने याबाबत हवाई वाहतूक कक्षाला माहिती दिली. सीआयएसएफने एअरपोर्ट पोलिसांना माहिती कळवली. त्यानुसार बुधवारी कुर्ला, विनोबा भावे आणि विमानतळ पोलिसांनी त्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन केले. मंगळवारी रात्री हवेत उडत असलेले ड्रोन इव्हेंट मॅनेजमेंटचे असण्याची शक्‍यता आहे. ड्रोनप्रकरणी कुर्ला पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: crime for dron use