चाईल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबईतील 30 वर्षीय व्यक्ती विरोधात गुन्हा - सीबीआयने दाखल केला गुन्हा

अनिश पाटील
Tuesday, 27 October 2020

अल्पवयीन मुलांना  फिल्मस्टार बनवण्याचे आमिष दाखवून यांच्याकडून आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ मिळवून त्यांना पोर्नोग्राफीमध्ये ढकलणाऱ्या मुंबईतील30वर्षीय व्यक्तीविरोधात  विरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला.

मुंबई :   अल्पवयीन मुलांना  फिल्मस्टार बनवण्याचे आमिष दाखवून यांच्याकडून आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ मिळवून त्यांना पोर्नोग्राफीमध्ये ढकलणाऱ्या मुंबईतील30वर्षीय व्यक्तीविरोधात  विरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला.  या प्रकरणी सीबीआयने घरामध्ये शोध मोहीम राबवली. 

मुंबईत 23 विभागात रुग्ण दुपटीचा दर 100 दिवसांच्या वर

 प्राथमिक आपसात आरोपीने अमेरिका, युरोप व दक्षिण आशियातील हजाराहून अधिक मुलांशी इन्टाग्रामद्वारे  संपर्क साधला असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही मुलं 10 ते 16 वयोगटातील आहेत.  घरात राबवण्यात आलेल्या शोधमोहिमेत मोबाईल वर लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे.   सायबर न्यायवैद्यक तज्ञांशी याप्रकरणी मदत घेण्यात येत आहे. आरोपीने व्हाट्सअप व इतर माध्यमांच्या सहाय्याने  परदेशी ग्राहकांना अश्लील फोटो व व्हिडीओ विकला असल्याचा संशय आहे. 

CSTM वर नवे प्रतिक्षालय गृह सुरु, 10 रूपयांमध्ये तासभर करता येणार प्रतिक्षा

 आरोपी स्वतःला फिल्म कलाकार असल्याचे सांगून  अल्पवयीन मुलांना फिल्म स्टार बनवण्याचे आमिष दाखवायचा.त्यानंतर त्यांच्याकडून असलेले फोटो व्हिडिओ बनवायचा त्यानंतर त्याच्या साह्याने ब्लॅक मेल करायचा.  त्यानंतर व्हिडीओ कॉलिंग च्या सहाय्याने लाइव्ह पोर्नोग्राफिक करण्यासाठी दबाव टाकायचा असा संशय आहे.  व्हिडिओ पुढे परदेशी ग्राहकांना वितरित करण्यात यायचे.   तसेच एखाद्याने  त्याचे ऐकण्यास नकार दिला दिल्यास आरोपी त्याचे अश्लील फोटो कुटुंबीय व नातेवाईकांना पाठवण्याची धमकी द्यायचा. आरोपीविरोधात  बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime filed against 30 year old man in Mumbai